परिणामकारक शैलीतील ‘हरवल्या आवाजाची फिर्याद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:13 AM2017-10-28T01:13:55+5:302017-10-28T01:14:15+5:30

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये बुक शेल्फ या सदरात रवींद्र मोराणकर यांनी रावसाहेब कुवर यांच्या ‘हरवल्या आवाजाची फिर्याद’ या पुस्तकाचा करून दिलेला परिचय.

Effective style of 'lost voice' | परिणामकारक शैलीतील ‘हरवल्या आवाजाची फिर्याद’

परिणामकारक शैलीतील ‘हरवल्या आवाजाची फिर्याद’

Next

रावसाहेब कुंवर यांचा ‘हरवलेल्या आवाजाची फिर्याद’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. मुखपृष्ठ आणि शीर्षकापासूनच या संग्रहाच्या दर्जेदारपणाची जाणीव होते. हरवलेला आवाज..माणसाचा, अन्यायाच्या व्यवस्थेविरुद्धच्या असंतोषाचा, नाराजीचा हा आवाज टाहो फोडतो आहे पण तो आतल्या आत. इथल्या व्यवस्थेने तो मुसक्या आवळून बंद केलेला. बैल हे कदाचित प्रतीक असेल कवीच्या शेतीमातीशी एकरूपतेचं. व्यवस्थेशी एकनिष्ठ राहूनही शेतक:याच्या वाटेला आलेलं बैलासारखंच गाडा ओढत जगावं लागणा:या आयुष्याचं. एक कविता वाचली आणि झटक्यात पान उलटलं असं या संग्रहाबाबत होत नाही. ती कविता वाचकाला तिथेच रेंगाळत ठेवते, आपल्याला अस्वस्थ करते, कवितेतल्या वेदनेचा धागा आपल्याशी गुंफून टाकते. प्रत्येक कवितेगणीक हा धागा मग जाळं विणतच जातो. मधूनमधून जितेंद्र साळुंखे याची कवितेच्या आशयाला साजेशी चित्र वेदनेचा तोच स्वर व्यक्त करताना उठाव देऊन जातात.पहिल्याच ‘गाव झालंय गोगलगाय’ या कवितेत शहरातून आलेल्या तकलादू योजनांची गावासाठी असलेली शून्य किंमत आणि ग्लोबल होण्याच्या नादात गावाची गेलेली रया फार प्रभावीपणे व्यक्त झालेली आहे. बॅनरमधील माणसं, खेडय़ातली पोरं बसली आहेत येडय़ासारखी, गाव जगू देत नाही शहर तगू देत नाही, बापाला शहरात करमत नाही अशा अनेक कवितांनी शहरीकरणाच्या नादात हरवत चाललेली संवेदनशीलता अतिशय सहज परंतु परिणामकारक शैलीत व्यक्त केलेली आहे. कवी : रावसाहेब कुंवर, प्रकाशक : विष्णू जोशी, काव्याग्रह प्रकाशन, पृष्ठे : 110, मूल्य 120 रुपये

Web Title: Effective style of 'lost voice'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.