नदीजोडच्या रखडलेल्या प्रकल्पांसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:13+5:302021-05-29T04:13:13+5:30

रुंदीकरण करणे ८५ लाख व आमदार स्थानिक विकासअंतर्गत महानुभव मंदिर सभामंडप बांधकाम करणे ९ लाख अशा दोन्ही ...

Efforts for stalled riverside projects | नदीजोडच्या रखडलेल्या प्रकल्पांसाठी प्रयत्न

नदीजोडच्या रखडलेल्या प्रकल्पांसाठी प्रयत्न

googlenewsNext

रुंदीकरण करणे ८५ लाख व आमदार स्थानिक विकासअंतर्गत महानुभव मंदिर सभामंडप बांधकाम करणे ९ लाख अशा दोन्ही विकासकामांचा भूमिपूजन सोहळा प. पु. आचार्य बिडकर बाबा यांच्या हस्ते अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बाजार समितीचे एल. टी. पाटील, माजी नगरसेवक भाईदास महाजन जानवे, येथील माजी सरपंच रावसाहेब पाटील, दादाभाऊ पाटील, जे. व्ही. पाटील, रणाईच्या सरपंच मीराबाई भिल, अंचलवाडी सरपंच भगवान पाटील, रणाईचे उपसरपंच भावेश पाटील, शिवाजी पाटील, राजू पाटील, सागर देवरे, दिलीप पाटील, युवराज भिल, युवराज पाटील, अशोक पाटील, सचिन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. हेमंत पाटील यांनी आभार मानले.

पश्चिम भागातील प्रकल्पांवर चर्चा -

यावेळी ग्रामस्थांशी या भागातील मागणी असलेल्या प्रकल्पांवर चर्चा करताना आमदार अनिल पाटील यांनी गावकऱ्यांचे समज गैरसमज यावर बोलतांना पांझरा माळण नदीजोड प्रकल्पासाठी अक्कलपाडा धरणावर पाण्याचे आरक्षण करणे, मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणे, हे काम सुरू असून, गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक बाबींना ब्रेक लागला आहे. याशिवाय यावर चार साठवण बंधारे भरणार आहेत. त्यामुळे आधीपासूनच पश्चिमेकडील उपेक्षित भाग सुजलाम सुफलाम व बारमाही पाणी व्यवस्था करणे हे ध्येय आमदार पाटील यांनी ठेवले आहे. त्यादृष्टिने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कोरोनाचा धोका वाढल्याने निधीसह अनेक बाबींना याबाबत फटका बसला आहे. आगामी काळात या भागातील प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, अशी ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी दिली.

Web Title: Efforts for stalled riverside projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.