काउंटरवर चॉपर ठेऊन गल्ल्यातून जबरीने काढले साडेआठ हजार रूपये

By सागर दुबे | Published: September 2, 2022 07:53 PM2022-09-02T19:53:38+5:302022-09-02T19:54:05+5:30

पैसे जर दिले नाही तर मी तुला व्यवसाय करू देणार नाही...

Eight and a half thousand rupees were forcefully removed from the street by placing a chopper on the counter in jalgaon | काउंटरवर चॉपर ठेऊन गल्ल्यातून जबरीने काढले साडेआठ हजार रूपये

काउंटरवर चॉपर ठेऊन गल्ल्यातून जबरीने काढले साडेआठ हजार रूपये

Next

जळगाव : पैसे जर दिले नाही तर मी तुला धंदा करू देणार नाही, असे म्हणत एकाने चॉपरचा धाक दाखवून मेडिकल चालकाच्या दुकानाच्या गल्ल्यातून साडेआठ हजार रूपयांची रोकड जबरीने काढून घेतल्याचा प्रकार बुधवारी रात्री ८.३० वाजता गेंदालाल मिल भागात घडला. याप्रकरणी मेडिकल चालकाने शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.

दादावाडी येथील बाळासाहेब लक्ष्मण पाटील यांचे गेंदालाल मिल येथे रामकृष्ण मेडिकल नावाचे औषधींचे दुकान आहे. बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मेडिकलवर अजीज खान बाबुखान पठाण (रा. गेंदालाल मिल) हा आला आणि तुला तुझे दुकान चालवायचे असेल तर मला पाच हजार रूपये महिना द्यावा लागेल, असे पाटील यांना म्हणला. मात्र, पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर अजीज खान याने कमरेला लावलेला चॉपर काउंटरवर ठेवून पैसे जर मला दिले नाही तर मी तुला धंदा करू देणार नाही, अशी धमकी देऊन त्याने पाटील यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर दुकानाच्या गल्ल्यातून अजीज खान याने साडेआठ हजार रूपयांची रोकड जबरीने काढून घेतली. मारहाण झाल्यामुळे पाटील हे जखमी झाले होते. उपचारानंतर त्यांनी शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार अजीज खान याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयिताला अटक
दरम्यान, शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यातील एपीआय संदीप परदेशी, ओमप्रकाश सोनी, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, रतन गिते, विजय निकुंभ आदींनी गेंदालाल मिल गाठून संशयित अजीज खान याला अटक केली आहे.

यापूर्वीही दुकानाची केली तोडफोड
अजीज खान याने यापूर्वी ८ ऑगस्ट रोजी बाळासाहेब पाटील यांच्या दुकानात येऊन तोडफोड केली होती. नंतर त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी हिसकावून पोबारा केला होता.

Web Title: Eight and a half thousand rupees were forcefully removed from the street by placing a chopper on the counter in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.