परप्रांतीयांसाठी आठ बसेस नागपूरला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 12:56 PM2020-05-19T12:56:48+5:302020-05-19T12:56:59+5:30
जळगाव : आरटीओ विभागाने सोमवारी सकाळी महामार्गावरुन जाणाऱ्या परप्रांतीय बांधवांच्या तीन ट्रक पकडून, जळगाव आगारात आणल्या होत्या. त्यांनतर या ...
जळगाव : आरटीओ विभागाने सोमवारी सकाळी महामार्गावरुन जाणाऱ्या परप्रांतीय बांधवांच्या तीन ट्रक पकडून, जळगाव आगारात आणल्या होत्या. त्यांनतर या ठिकाणाहून परप्रांतीय बांधवांना सोडण्यासाठी आठ बसेस नागपूरला रवाना झाल्या.
शहरात कोरोनाचे रूग्ण दिवसागणिक वाढत असतानांही आरटीओ विभागाने परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार खटाटोप करुन सोमवारी सकाळी परप्रांतीयांच्या तीन ट्रक पकडून जळगाव आगारात आणल्या. या ठिकाणी परप्रांतीय मजूरांची तपासणी व जेवण देण्यात आले. त्यानंतर एस. टी. बसने छत्तीसगडची सीमा लागणाºया नागपूर येथे या बांधवांना सोडण्यासाठी आठ बसेस रवाना झाल्याचे आगार व्यवस्थापक नीलेश पाटील यांनी सांगितले. दरम्यान, परप्रांतीय बांधवांना ३१ मे पर्यंत एस. टी. बसने मोफत सीमेवर सोडण्याचे महामंडळाचे आदेश जळगाव आगाराला प्राप्त झाले असल्याचेही पाटील यांनी सांगितले. परप्रांतीयांना रवाना करतेवेळी आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे, वाहतूक अधिक्षिका निलिमा बागुल, कामागार अधिकारी प्रशांत महाजन, वाहतूक अधिकारी निलेश बंजारा यासह प्रशासन अधिकारी व इतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने होते.