१२ लाखाच्या मुद्देमालासह आठ जुगाऱ्यांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 08:19 PM2020-08-31T20:19:16+5:302020-08-31T20:19:27+5:30

एलसीबीची कारवाई : तालखेडा शिवारात सुरु होता अड्डा

Eight gamblers caught with Rs 12 lakh | १२ लाखाच्या मुद्देमालासह आठ जुगाऱ्यांना पकडले

१२ लाखाच्या मुद्देमालासह आठ जुगाऱ्यांना पकडले

Next


जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील मालखेडा शिवारातील उमरा फाट्याजवळ सुरु असलेल्या जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी छापा टाकला. त्यात आठ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून ७८ हजार ९०० रुपयांच्या रोकडसह १२ लाख ४१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय नामदेव पांडे (रा.कुºहा, ता.मुक्ताईनगर) संतोष गोपाळ जवरे, मंगेश विष्णू मानकर (रा.पिंपळगाव काळे, ता.जळगाव जामोद, जि.बुलडाणा), गजानन देविदास ढाणे, संदीप सागर पाटील (रा.पारंबी,ता.मुक्ताईनगर), कृष्णा चंद्रकांत बजरे (रा.खेराळा, ता. मुक्ताईनगर), सोपान नारायण खिरळकर (रा.कुºहा, ता.मुक्ताईनगर) व सोपान जनार्दन वरगे (रा.लोणवाडी, ता.नांदुरी, जि.बुलडाणा) अशी जुगाºयांची नावे आहेत. त्यांच्याकडून ७८ हजार ९०० रुपये रोख, ७२ हजार ५०० रुपये किमतीचे १० मोबाईल, २० दुचाकी, एक चार चाकी व एक रिक्षा असा एकूण १२ लाख ४१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम, उपनिरीक्षक सुधाकर लहारे, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, रवींद्र घुगे, शरद भालेराव, महेश महाजन, रामकृष्ण पाटील, राहूल पाटील, महेश पाटील, रमेश जाधव व राजेंद्र पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. जितेंद्र पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली.

Web Title: Eight gamblers caught with Rs 12 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.