एरंडोल येथे एकाच कुटुंबातील आठ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 07:43 PM2020-06-09T19:43:50+5:302020-06-09T19:44:02+5:30
नागरिकांमध्ये खळबळ
एरंडोल : शहरासह ग्रामीण भागातील एकूण २९ स्वॅब चे अहवाल मंगळवारी संध्याकाळी प्राप्त झाले असून त्यात एरंडोल येथील एकाच परिवारातील आठ जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ३० वर्षीय महिला, ९ वर्षाचा मुलगा, १९ वर्षीय युवक, १७ वर्षीय युवक, १३ वर्षाचा मुलगा, ४५ वर्षीय पुरुष, ३६ वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे. तसेच एरंडोल तालुक्यात ग्रामीण भागात उत्राणयेथे ०२ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली. याप्रमाणे नव्याने एकूण १० पॉझिटिव्ह रुग्ण. संख्या आहे. याचबरोबर एकाच कुटुंबातील १२ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तेसच गांधीपुरा एरंडोल ०२ ग्रामीण रुग्णालय सिस्टर ०१ , उत्राण ०४ याप्रमाणे १९ अहवाल निगेटिव्ह आले आहे.
मंगळवारी २९ स्वॅबच्या अहवालात १० रुग्ण पॉझिटिव्ह असल्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या २९ वर पोहोचली.