वॉटरग्रेसबाबत आठ महिन्यांपूर्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:17 AM2020-12-06T04:17:05+5:302020-12-06T04:17:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वॉटरग्रेस कडून सफाईचे काम व्यवस्थित होत नसल्याची ओरड करीत मार्च महिन्यातील स्थायी समितीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वॉटरग्रेस कडून सफाईचे काम व्यवस्थित होत नसल्याची ओरड करीत मार्च महिन्यातील स्थायी समितीच्या सभेत ‘गो वॉटरग्रेस गो...’ अशा घोषणा देणारे मनपातील विरोधी पक्षांचे नगरसेवक आठ महिन्यात असे काय घडले की एकदम शांत झाले आहेत? असा सवाल उपस्थित होत आहे. सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांमध्येही नाराजी असली तरीही पक्षातील वरिष्ठ नेत्यांचाच यात संबंध असल्याने व काही नगरसेवक पार्टनर असल्याने त्यांचा नाईलाज असल्याचीही चर्चा मनपा वर्तुळात सुरू झाली आहे.
मनपाच्या मार्च महिन्यातील स्थायी समिती सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये वॉटरग्रेसवरून जोरदार खडाजंगी झाली होती. यात विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी गिरीश महाजन व आमदार सुनील भोळे यांना लक्ष्य करीत वॉटरग्रेसच्या ठेक्यात नाव न घेता भाजप पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोपही केला होता.
तर भाजपा गटनेते भगत बालाणी यांनी विरोधक व प्रशासनाचेच वॉटरग्रेसशी लागेबांधे असल्याचा आरोप केला होता.
१५ हजारांची चर्चा ठरतेय खरी
वॉटरग्रेसला काम बंद केल्यानंतर पुन्हा संधी देण्यात आली. त्यात तक्रारी करणाऱ्या नगरसेवकांची तोंड बंद करण्यासाठी दरमहा १५ हजारांचे पाकीट दिले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केला होता. यात सत्ताधारी व विरोधक सर्वच नगरसेवकांचा समावेश असल्याचा आरोप केला होताौ
८ महिन्यांपूर्वी वॉटरग्रेसविरोधात आक्रमक असलेले मनपातील विरोधक नगरसेवक आता बीएचआर प्रकरणावरून वॉटरग्रेस पुन्हा प्रकाश झोतात आल्यावरही गप्पच का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे १५ हजारांच्या हप्त्याची चर्चा खरी ठरताना दिसत असल्याचे मनपा वर्तुळात बोलले जात आहे.