मनपा शिक्षकांचे आठ, तर सेवानिवृत्तांचे सात महिन्यांचे वेतन थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:16 AM2021-04-27T04:16:37+5:302021-04-27T04:16:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सद्य:स्थितीला कोरोनाने हाहाकार माजविला आहे. अनेक बेरोजगार झाले, तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

Eight months salary of corporation teachers and seven months salary of retirees | मनपा शिक्षकांचे आठ, तर सेवानिवृत्तांचे सात महिन्यांचे वेतन थकीत

मनपा शिक्षकांचे आठ, तर सेवानिवृत्तांचे सात महिन्यांचे वेतन थकीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सद्य:स्थितीला कोरोनाने हाहाकार माजविला आहे. अनेक बेरोजगार झाले, तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात मनपा शिक्षण मंडळात कार्यरत असलेल्या १५२ शिक्षकांचे आठ महिन्यांपासून, तर ४६५ सेवानिवृत्त शिक्षकांचे सात महिन्यांपासून महापालिकेकडून देण्यात येणारे पन्नास टक्के वेतन थकले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळांतर्गत १५२ शिक्षक, तर ४६५ सेवानिवृत्त कार्यरत आहेत. या शिक्षक व सेवानिवृत्तांच्या वेतनासाठी शासन पन्नास टक्के अनुदान देते, तर पन्नास टक्के निधी हा महानगरपालिका शिक्षण मंडळाला देत असते. मात्र, गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून मनपाने पन्नास टक्के वेतन थकविले आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोचा कहर वाढला आहे. अनेक शिक्षक व सेवानिवृत्तसुद्धा बाधित झाले आहेत. उपचारासाठी पैशांची आवश्यकता आहे. त्यात थकीत वेतन मिळत नसल्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आर्थिक चणचण भासत असल्यामुळे रखडलेले वेतन अदा करण्याची मागणी होत आहे.

अशी आहे थकीत रक्कम

फेब्रुवारी २०१९ पासून मार्च २०२१ या कालावधीत तब्बल आठ महिन्यांचे शिक्षकांचे, तर सप्टेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीतील सात महिन्याचे सेवानिवृत्तांचे वेतन थकीत आहे. सुमारे शिक्षकांच्या वेतनाची तीन कोटी १५ लाख १५ हजार २९३ रुपये, तर सेवानिवृत्ती वेतन तीन कोटी ३९ लाख ६७ हजार ८३३ रुपये मनपाकडे थकीत आहे. हे पन्नास टक्के वेतन मनपाने अदा न केल्यामुळे शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक हे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. एकूण सहा कोटी ५८ लाख ५७ हजार २२८ रुपयांची वेतनाची थकबाकी मनपाकडे आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही वेतन थकले

मनपा शिक्षण मंडळातील तीन शिक्षकेतर कर्मचारी व २४ सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेसुद्धा दोन महिन्यांचे वेतन थकले आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ९३ हजार ४२२ व सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दोन लाख ८० हजार रुपये मनपाकडे थकले आहेत.

=============

-शिक्षकांचे थकीत वेतन

महिना रक्कम

फेब्रुवारी-२०२९ ३४,२३,४८०

सप्टेंबर-२०२० ३७,६८,४२५

ऑक्टोबर-२०२० ३८,८३,१०९

नोव्हेंबर-२०२० ४५,१९,६७२

डिसेंबर-२०२१ ३६,६९,४१३

जानेवारी-२०२१ ४७,५१,१९४

फेब्रुवारी-२०२१ ३७,०००००

मार्च-२०२१ ३७,०००००

============================

-सेवानिवृत्त शिक्षकांचे थकीत वेतन

महिना रक्कम

सप्टेंबर-२०२० ४६,१९,२७७

ऑक्टोबर-२०२० ४७,९९,४८२

नोव्हेंबर-२०२० ४९,०९,५३५

डिसेंबर-२०२१ ४७,८७,४०६

जानेवारी-२०२१ ५४,७७,२८५

फेब्रुवारी-२०२१ ४६,७४,८४६

मार्च-२०२१ ४७,०००००

========================

- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन

महिना रक्कम

फेब्रुवारी-२०२१ ४६,७११

मार्च-२०२१ ४६,७११

========================

- सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन

महिना रक्कम

फेब्रुवारी-२०२१ १,४०,३४०

मार्च-२०२१ १,४०,३४०

========================

-एकूण शिक्षक : १५२

-एकूण सेवानिवृत्त शिक्षक : ४६५

-एकूण शिक्षकेतर कर्मचारी : ०३

-एकूण शिक्षकेतर सेवानिवृत्त कर्मचारी : २४

Web Title: Eight months salary of corporation teachers and seven months salary of retirees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.