आठ महिन्यातच मतदानाचा टक्का ८ टक्क्यांनी घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:28 PM2019-04-27T12:28:39+5:302019-04-27T12:30:09+5:30

मनपा निवडणुकीत झाले होते ५७ टक्के मतदान

In eight months, the voting percentage dropped by 8 percent | आठ महिन्यातच मतदानाचा टक्का ८ टक्क्यांनी घटला

आठ महिन्यातच मतदानाचा टक्का ८ टक्क्यांनी घटला

Next

जळगाव : लोकसभेसाठी २३ रोजी झालेल्या मतदानात जळगाव शहरात केवळ ४९ टक्के मतदान झाल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. कारण आठ महिन्यांपूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीत जळगाव शहरात ५७ टक्के मतदान झाले होते. केवळ आठ महिन्यांचा अंतरातच शहराच्या मतदानाच्या टक्केवारीत ८ टक््क्यांची घट का झाली ? याबाबत राजकीय पक्ष व प्रशासनाकडून विचारमंथन सुरु आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी यंदा जळगाव मतदार संघात भाजपा व राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये काट्याची लढत रंगलेली पहायला मिळाली. तसेच निवडणुकीआधी भाजपाकडून विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करत चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर प्रचारादरम्यान अमळनेर येथे झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष व माजी आमदारांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर भाजपाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली. त्यामुळे भाजपा नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांकडून मतदान काढण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी अपेक्षा होती. मात्र शहरात भाजपाचे ५७ नगरसेवक असताना शहरात केवळ ४९ टक्के मतदान झाल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तापमानाचाही परिणाम
मनपा निवडणुकीच्या वेळेस पावसाळा असल्याने तापामान जास्त नव्हते. मात्र, २३ रोजी झालेल्या लोकसभेच्या मतदानावेळी ४२ अंश सेल्सीअस तापमान असल्यामुळे दुपारी १२ पर्यंत चांगले मतदान झाले. दुपारून मात्र मतदान करण्यासाठी नागरिक बाहेर निघाले नाहीत.
मनपाची पुनरावृत्ती न झाल्याने नगरसेवक झाले नाराज
भाजपाकडून जळगाव लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे या निवडणुकीत देखील मनपा निवडणुकीप्रमाणे मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होईल अशी अपेक्षा नगरसेवकांकडून केली जात होती. मात्र, कोणत्याही राजकीय पक्षाने पैसेवाटप न करण्यावर भर दिला. तर काही ठिकाणी पैसे वाटपाचे काम बाहेरच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविल्यामुळे देखील नगरसेवक नाराज असल्याने नगरसेवकांनी आपल्या प्रभागात उपस्थित राहून केवळ औपचारिकता बजावल्याचे पहायला मिळाले. मतदान काढण्यासाठी नगरसेवकांकडून कोणतेही प्रयत्न झाले नाही. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचेही बोलले जात आहे.

Web Title: In eight months, the voting percentage dropped by 8 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव