जैतपिर येथील हाणामारी प्रकरणी आठ जणांना १ वर्षाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 09:54 PM2018-09-14T21:54:07+5:302018-09-14T21:55:59+5:30
मालमत्तेच्या वादातून तालुक्यातील जैतपिर येथील मारहाण प्रकरणी जिल्हा व अति सत्र न्या आर.पी. पांडे यांनी आठ जणांना एक वर्ष शिक्षा सुनावली आहे.
अमळनेर - मालमत्तेच्या वादातून तालुक्यातील जैतपिर येथील मारहाण प्रकरणी जिल्हा व अति सत्र न्या आर.पी. पांडे यांनी आठ जणांना एक वर्ष शिक्षा सुनावली आहे.
तालुक्यातील जैतपीर येथील दोन भावांमध्ये मालमत्तेवरून वाद झाला होता. त्यामुळे संतापलेल्या केशवचा भाऊ पंडित देवराज यांनी १९ रोजी नातेवाईकांना गावी बोलावत भांडण केले. यात झालेल्या भांडणात फिर्यादी केशव गंभीर देवराज व त्याच्या दोन मुलांना जबर मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास तपासाधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक एम.जी.साटोटे यांनी आरोपी जितेंद्र विरभान (ब्राह्मणे लोण ता भडगाव), पंडित रामदास हाडिंगे, रघुनाथ रामदास हाडींगे (दोन्ही रा.पिंपरखेड ता भडगाव), पंडित गंभीर देवराज, विनोद पंडित देवराज (रा.जैतपीर ता.अमळनेर), दत्तू पंडित हाडींगे (रा.पिंपरखेड ता.भडगाव) व मिथुन रामदास गोळे (रा.बोरगाव ता.अमळनेर) यांना अटक केली होती. सरकारी वकील राजेंद्र चौधरी यांनी एकूण ७ साक्षीदार तपासले. आरोपीना कलम ३२४ मध्ये एक वर्ष शिक्षा आणि प्रत्येकी ५०० रु दंड,१४३ मध्ये ६ महिने शिक्षा आणि प्रत्येकी ५०० रु दंड, १४८ व १४९ मध्ये एक वर्ष शिक्षा आणि प्रत्येकी ५०० दंड अशी शिक्षा सुनावली.