वाहन पेटविल्याप्रकरणी आठ संशयितांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:14 AM2019-02-14T00:14:37+5:302019-02-14T00:18:53+5:30
गायींची वाहतूक
एरंडोल : गाईची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पेटवल्याप्रकरणी १३ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.५५ वा. एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणी रिंगणगाव येथील आठ जणांना अटक करण्यात आली असून आरोपींना एरंडोल न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
आरोपीमध्ये प्रमोद गोपीचंद पाटील, महेंद्र किसन माळी, शिवाजी एकनाथ पडवळ, वाल्मिक पुंडलिक शिंदे, रामकृष्ण नारायण रोहिमारे, योगराज साहेबराव लंके, नीलेश एकनाथ पडोळ, अनिल संतोष शिंदे यांचा समावेश आहे.
बुधवारी रात्री झालेल्या या घटनेत जमावाला पोलिसांनी त्याबाबत मज्जाव केला असता पोलीस निरीक्षक हजारे यांना मारहाण करण्यात आली व पो. का. संदीप सातपुते यांच्या डोक्याला लाकडी काठी मारण्यात आली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांची भेटून घटनेची माहिती जाणून घेतली. बजरंग दलाचे जिल्हा संयोजक राकेश लोहार, सहसंयोजक सचिन येवले व विनोद खाडे यांनीसुद्धा एरंडोल पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेबाबत माहिती घेतली.
चाळीसगाव व अमळनेर विभागाचे पोलीस विभागीय अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गाईची वाहतूक करणाºया वाहन चालक इम्तियाज कुरेशी (वय २६) व त्याचा साथीदार इद्रीस शब्बीर कुरेशी (वय २१) दोन्ही रा.पाळधी, ता. धरणगाव या दोघांविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.