कॅशलेस व्यवहाराबाबत जनजागृती करणा:या आठ रासेयो स्वयंसेवकांना पुरस्कार
By admin | Published: July 10, 2017 04:19 PM2017-07-10T16:19:14+5:302017-07-10T16:19:14+5:30
कॅशलेस सोसायटी निर्माण करण्यासाठी जनजागृती करणा:या आठ रासेयो स्वयंसेवकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
Next
>ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.10- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे कॅशलेस सोसायटी निर्माण करण्यासाठी जनजागृती करणा:या आठ रासेयो स्वयंसेवकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात कॅशलेस व्यवहारांना चालना मिळावी तसेच या धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील विद्यापीठे/महाविद्यालये यामधील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी/समन्वयक/स्वयंमसेवकांना या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालये व परिसंस्थामधील रासेयांच्या विद्याथ्र्यांसाठी रोकडरहित महाराष्ट्राचे विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार योजना राबविण्यात आली. विद्यापीठातर्फे यासंदर्भात प्रस्ताव मागविण्यात आले होते.
शहरी भागातील सहा व ग्रामीण भागातील दोन विद्याथ्र्यांना रोकडरहित महाराष्ट्राचे विद्यापीठस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 500 रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप राहणार आहे. विद्यापीठाच्या कार्यक्रमात हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
पुरस्कार विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे-
शहरी भाग- रंजितसिंग राजपूत (डी.एन.भोळे महाविद्यालय, भुसावळ), राजनंदिनी भदाणे (एस.एस.व्ही.पी.एस.चे डॉ.पी.आर.घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे), योगिता गिरासे (पीएसजीव्हीपीएसचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शहादा), कुणाल मानकर व गौरव कोळी (धनाजी नाना महा.फैजपूर), आकाश धनगर (ज.जि.म.वि.प्र.सह.समाजाचे कला,वाणिज्य व विज्ञान महा.जळगाव), ग्रामीण भाग- मयुर चव्हाण आणि महावीर वाघ (उत्तमराव पाटील कला व विज्ञान महा.दहिवेल,ता.साक्री)