आठ वर्षीय बालीकेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 10:30 PM2019-12-10T22:30:29+5:302019-12-10T22:30:34+5:30
चाळीसगाव : माजी सैनिकास अटक
चाळीसगाव : किराणा दुकानावर आलेल्या आठ वर्षीय मुलीला खेळण्याच्या बहान्याने दुकानात ओढत नेत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अदित्य नगरातील किराणा दुकानदार व माजी सैनिक नितीन ईश्वर ठाकरे या नराधमास पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना ९ रोजी रात्री १० वाजता घडली. पाटणादेवी रोडवरील अदित्य नगर भागात मनुमाता किराणा दुकानावर ८ वर्षाची मुलगी ढोकळ्याचे पीठ घेण्यासाठी गेली होती. दुकान मालक नितीन ईश्वर ठाकरे याने तुला गेम खेळता येतो ? असे विचारुन त्या मुलीला दुकानात नेत तिच्याशी गैरवर्तन केले. हा प्रकार त्या मुलीने घरी येवून तिच्या आईला सांगितला. तिच्या आईने सदर दुकानावर जावून या प्रकाराचा जाब विचारत असतांना परिसरातील रहिवाशांची या ठिकाणी गर्दी जमा झाली. त्या मुलीच्या आईच्या फियार्दीवरुन चाळीसगाव शहर पोलीसात १० रोजी किराणा दुकान मालक नितीन ईश्वर ठाकरे याच्या विरुध्द भा.दं.वि.कलम ३५४ (अ), बालकांचे लैंगीग गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियम (पोस्को) २०१२ चे कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला पोलीसांनी अटक केली आहे. नितीन ठाकरे हा माजी सैनिक असून गेल्या दोन वषार्पूर्वीच तो निवृत्त झाला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव करीत आहेत.