एकनाथ खडसे- गिरीश महाजन भाजपा कार्यालयात शेजारी-शेजारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 08:10 PM2020-01-02T20:10:48+5:302020-01-02T20:15:39+5:30
दोघांच्याही व्यक्तव्याकडे सर्वांचे लक्ष
जळगाव : देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांच्यामुळे आपले विधानसभेचे तिकीट कापले गेले, असा आरोप करणारे एकनाथ खडसे आणि हा आरोप फेटाळून लावणारे गिरीश महाजन जळगाव येथील भाजपा कार्यालयात जि.प. अध्यक्ष निवडीसंदर्भात एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे कार्यालयात ते दोघेही शेजारी-शेजारी बसले आहेत. त्यामुळे दोघेही काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनीच जाणीवपूर्वक माझे तिकीट कापले. त्यांना माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणायची होती, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडाली. याच विषयासंदर्भात गिरीश महाजन यांनी गुरुवारी दुपारी जामनेरात आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधत एकनाथ खडसे यांनी केलेल्या प्रत्येक आरोपावर खुलासा केला.
त्यानंतर जळगाव येथे जि. प. अध्यक्ष निवडीसंदर्भात भाजपाची बैठक होत आहे. या निमित्ताने एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले आहेत. भाजपा कार्यालयात ते दोघेही शेजारी बसले असून दोघांच्याही व्यक्तव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी बातम्या...
('त्या' नेत्यांमुळेच माझं तिकीट कापलं; खडसेंच्या आरोपांवर महाजन म्हणतात...)
(फडणवीस, महाजनांमुळे माझं तिकीट कापलं; खडसेंकडून पहिल्यांदाच नाव घेऊन गंभीर आरोप)
(खडसेंच्या वक्तव्याने गुलाबराव पाटलांच्या दाव्याला बळ)
(खडसेंचं स्पष्टीकरण, फडणवीसांसोबतचे संबंध बिघडलेले नाहीत, पण...)