Eknath Khadse : गुगलवर टाका, टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण?, खडसेंची कार्यकर्त्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 09:46 AM2021-10-05T09:46:23+5:302021-10-05T09:47:19+5:30

Eknath Khadse : एकनाथ खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा नेत्यांवरही प्रहार केला. तसेच, माझ्या मुलीचा पराभव करणारा गद्दार कोण हे मला राष्ट्रवादीत आल्यानंतर समजलं, असेही खडसेंनी म्हटलं.

Eknath Khadse : Put it on Google, who is Watermelon of Maharashtra ?, Eknath Khadse advises activists on critics devendra fadanvis | Eknath Khadse : गुगलवर टाका, टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण?, खडसेंची कार्यकर्त्यांना सूचना

Eknath Khadse : गुगलवर टाका, टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण?, खडसेंची कार्यकर्त्यांना सूचना

googlenewsNext
ठळक मुद्देएका व्यक्तीचं ऐकूनच नाथाभाऊला वारंवार छळायचं, बदनाम करायचं काम त्या पक्षात झालं, ती व्यक्त कोण हे तुम्हाला माहिती आहे, असे एकनाथ खडसेंनी म्हटल. त्यावेळी, उपस्थित कार्यकर्त्यांनी टरबूज असे संबोधले.

जळगाव - भोसरी भूखंड प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर येथे जाऊन समन्स बजाविले. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ईडीचे पथक मुक्ताई नगरातील खडसे यांच्या फार्म हाऊसवर धडकले. त्यावेळी तिथे कुणीच नसल्याने बाहेर गेटवर हे समन्स अडकविण्यात आल्याची चर्चा आहे. आता खडसेंनी ईडीच्या कारवाईबाबत बाजू मांडली आहे. तसेच, मी काय गायब नव्हतं, दोन दिवस फर्दापूरच्या रेस्ट हाऊसवर होतो, असे स्पष्टीकरणही खडसेंनी दिलं.  

एकनाथ खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा नेत्यांवरही प्रहार केला. तसेच, माझ्या मुलीचा पराभव करणारा गद्दार कोण हे मला राष्ट्रवादीत आल्यानंतर समजलं, असेही खडसेंनी म्हटलं. ज्या नाथाभाऊंनी भाजपमध्ये कष्ट केली, 40 वर्षे पक्ष वाढविण्यासाठी काम केलं, सायकलवरही फिरला, त्याची भाजपा झाली नाही, असे म्हणत खडसेंनी भाजपमधील काही नेत्यांवर हल्लाबोल केला. 

एका व्यक्तीचं ऐकूनच नाथाभाऊला वारंवार छळायचं, बदनाम करायचं काम त्या पक्षात झालं, ती व्यक्त कोण हे तुम्हाला माहिती आहे, असे एकनाथ खडसेंनी म्हटल. त्यावेळी, उपस्थित कार्यकर्त्यांनी टरबूज असे संबोधले. त्यानंतर, एकनाथ खडसेंनी मला नाही माहिती, असे म्हणत बोलायचे टाळले. पण, मला एक माहितीय असे म्हणत पुन्हा टरबूज शब्दावर भाष्य केलं. तुमच्या मोबाईलचं नेट ओपन करा, गुगलवर जावा आणि त्यावर टाका, टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण?, इथून घरी गेल्यावर पहिलं काम ते करा, असे सल्लाही खडसेंनी कार्यकर्त्यां दिला. तसेच, हे मी म्हणत नाही, जगातील प्रसिद्ध कंपनी असलेल्या गुगलकडून टरबूज ऑफ महाराष्ट्रा कोण आहे? हे उत्तर येतंय, असे म्हणत खडसेंनी फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

ईडीच्या चौकशीबाबत खुलासा

एकनाथ खडसेंना ईडीने घरपोच नोटीस बजावल्याने जिल्ह्यात अनेक चर्चा आणि अफवा पसरल्या होत्या. आता, खडसेंनी ईडीच्या कारवाईसंदर्भात आपणास जाणूनबुजून अडकविण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. केवळ 2 कोटी रुपयांच्या कर्ज व्यवहारप्रकरणात माझा ईडीचा तपास होत आहे. ते कर्जही मी नियमाने फेडले आहे. विशेषत: ईडीची कारवाई हजार-बाराशे कोटी रुपयांच्या प्रकरणात होत असते, असे खडसेंनी म्हटले. माझ्या जावयाला कोणताही संबंध नसताना अटक केली. कोणत्याही परिस्थितीत नाथाभाऊला अटक  करून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केले जात आहेत. एक टक्का जरी खरं असेल तर आपण फाशी घ्यायला तयार आहोत. गेल्या चाळीस वर्षात कोणतीही तक्रार नव्हती. अचानक बिघडायला का मी विश्वामित्र आहे? असा सवालच एकनाथ खडसेंनी विचारला. मी साधा माणूस आहे. पण, मला बदनाम करण्याचे, चोर ठरविण्याचे हे जे काही षडयंत्र सुरू आहे हे मी भारी आहे, म्हणून हे केले जात आहे, असंही खडसेंनी म्हटले. 

गद्दार ओळखला

राष्ट्रवादी पक्षात आल्यावर भाजपमधील गद्दार कोण होते, याची आपल्याला माहिती मिळाली. भाजपमध्ये कोण कोण गद्दार होते आणि माझ्या मुलीचा पराभव केला हे मला राष्ट्रवादी पक्षात आल्यानंतर कळल्याचं त्यांनी स्पष्टच सांगितलं. खडसेंनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका करत, आपण कुणाच्या कृपेने आमदार झाले याची आठवण ठेवावी. उगाच जामनेरवाल्याच्या कानातील कुरघोड्या ऐकत बसू नये, जामनेरवाल्यानेच आपल्या मागे ईडी लावली, वेगवेगळ्या चौकशा लावल्या, इन्कम टॅक्स लावल्याचा आरोप खडसेंनी केला आहे. 
 

Web Title: Eknath Khadse : Put it on Google, who is Watermelon of Maharashtra ?, Eknath Khadse advises activists on critics devendra fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.