भाजपाच्या बैठकीत एकनाथ खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी, गिरीश महाजन यांच्याबद्दल अपशब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 01:04 AM2017-08-27T01:04:00+5:302017-08-27T01:05:00+5:30

भाजपात अन्य नेत्यांवरही आरोप झाले मात्र त्यांना वेगळा अन् खडसेंना वेगळा न्याय का? खडसेंचे पुनर्वसन का केले जात नाही, यावरून शनिवारी भाजपाच्या जिल्हा बैठकीत खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Eknath Khadse supporters boast of vandalism, Girish Mahajan scandal at BJP meeting | भाजपाच्या बैठकीत एकनाथ खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी, गिरीश महाजन यांच्याबद्दल अपशब्द

भाजपाच्या बैठकीत एकनाथ खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी, गिरीश महाजन यांच्याबद्दल अपशब्द

Next

जळगाव : भाजपात अन्य नेत्यांवरही आरोप झाले मात्र त्यांना वेगळा अन् खडसेंना वेगळा न्याय का? खडसेंचे पुनर्वसन का केले जात नाही, यावरून शनिवारी भाजपाच्या जिल्हा बैठकीत खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दलही अपशब्द काढले. या गोंधळातच माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी खडसेंच्या पुनर्वसनासाठी जिल्ह्याने पाठपुरावा करण्याचा ठराव मांडला.
एमआयडीसीतील खाजगी हॉटेलच्या प्रांगणात दुपारी ही बैठक झाली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जैन मुनींबद्दल अपशब्द काढल्याने त्यांच्या निषेधाचा ठराव यावेळी झाला. या दरम्यान खडसे समर्थकांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निषेधाचा ठराव करण्यात यावा, अशी मागणी केली. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी पुढे येत खडसेंना मंत्रिमंडळातून बाहेर का ठेवण्यात येत आहे. काही नेत्यांवर आरोप होऊन वेगळा न्याय दिला जातो, मग खडसेंबद्दलच अशी भूमिका का? त्यांच्या पुनर्वसनाचा ठराव मांडा, असे सांगत प्रचंड आरडाओरड व गोंधळ सुरू झाला.
बैठकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, अनेक वर्षे मंत्रीपद भोगले पण आता त्यासाठी भिक नको...तसे वाटता कामा नये. जे केले ते पक्षवाढीसाठी केले. ज्येष्ठ नेते अडवाणींचे काय झाले..असा चिमटा घेऊन नव्यांना संधी दिली पाहिजे, आम्ही मार्गदर्शन करू असा चिमटाही त्यांनी घेतला.

बांडगुळाचे काय?
खडसेंचे भाषण सुरू असताना एक कार्यकर्ता गिरीश महाजन यांचे नाव न घेता म्हणाला.. बांडगुळाचे काय? यावर खडसे उत्तरले.. त्यांच्याही कर्तृत्वाला वाव दिला जावा. तुम्ही सयंम ठेवा. पक्ष शिस्तीचे पालन करा. याचा महाजन यांनी भाषणात चांगला समाचार घेतला. ते म्हणाले की, पक्षासाठी आम्हीही जिवाचे रान केले. कुण्या एकट्याच्या जिवावर हा पक्ष वाढलेला नाही. माझ्याबद्दल अपशब्द वापरले गेले. मी उत्तर देऊ शकतो पण बोलणार नाही. बोलणा-यांचे डोके ठिकाणावर आहे काय?

महाजन इन खडसे आउट...
दुपारी १.३० वाजता ही बैठक होती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे दुपारी ४.३० वाजता बैठक स्थळी पोहचले. यावेळी खडसे यांनी भाषण आटोपले. महाजन यांच्याशी बोलून ते बाहेर पडले. खडसे बाहेर पडताच त्यांचे अनेक समर्थक कार्यकर्तेही सभागृहाबाहेर पडले.

Web Title: Eknath Khadse supporters boast of vandalism, Girish Mahajan scandal at BJP meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा