पोषण आहार घोटाळ्याबाबत एकनाथ खडसेंचे शिक्षण मंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:42 AM2020-12-17T04:42:22+5:302020-12-17T04:42:22+5:30

जळगाव : तीन वर्षांपूर्वी भडगाव, मुक्ताईनगर, चाळीसगाव व जळगाव या चार तालुक्यांमध्ये पोषण आहारात झालेल्या अपहाराबाबत आर्थिक गुन्हे ...

Eknath Khadse's letter to the Education Minister regarding the nutrition scam | पोषण आहार घोटाळ्याबाबत एकनाथ खडसेंचे शिक्षण मंत्र्यांना पत्र

पोषण आहार घोटाळ्याबाबत एकनाथ खडसेंचे शिक्षण मंत्र्यांना पत्र

Next

जळगाव : तीन वर्षांपूर्वी भडगाव, मुक्ताईनगर, चाळीसगाव व जळगाव या चार तालुक्यांमध्ये पोषण आहारात झालेल्या अपहाराबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, वरील चार तालुक्यांमध्ये जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत धान्य माल व तांदूळ वाटपामध्ये अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी संगनमत करुन आर्थिक अपहार केलेला आहे. या प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीनेही कुठल्याही नोंदी नोदविलेल्या नाहीत. या सर्व प्रकरणामध्ये पावत्यांवर योग्य ती दुरूस्ती न करता पुरवठादारास फायदा पोहचविण्यास कारणीभूत ठरणारे मुख्याध्यापक दोषी आहेत. असे असतांना जिल्हा परिषदेच्या सीईओंनी पुरवठादाराला वाचविण्यासाठी या प्रकरणातील सर्वांनी क्लीन चीट दिली आहे. तरी या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखे मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी खडसे यांनी पत्राद्वारे केली आहे.

इन्फो :

भडगाव, मुक्ताईनगर, चाळीसगाव व जळगाव या चार तालुक्यात शालेय पोषण आहाराच्या योजनेत मोठा गैरव्यहार झाला असून, इतर तालुक्यातही हा प्रकार झाला आहे. या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी होऊन, दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहले आहे.

एकनाथ खडसे, माजी मंत्री

Web Title: Eknath Khadse's letter to the Education Minister regarding the nutrition scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.