एकनाथराव खडसे म्हणतात, ‘आता निवडणूक लढविण्याची इच्छा नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:38 AM2018-10-23T01:38:57+5:302018-10-23T01:39:56+5:30

गेल्या १५ वर्षांपासून राज्यात सत्ता आणण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी व मी आम्ही चार लोकांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. कॉंग्रेस सरकारच्या विरोधात पूर्ण वातावरण निर्मिती केली, आमच्या चार लोकांच्या व्यतिरिक्त कोणीही मेहनत घेतली नाही. पण मनात कुठे तरी खंत आहे की राज्यात सरकार आणल,े पण मंत्रीपद सोडावे लागले. माझी आता निवडणूक लढण्याची इच्छा नाही, कारण अशी परिस्थिती कायम राहिल्यास माझा स्वतंत्र निर्णय मी घेण्यास सक्षम असल्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

Eknathrao Khadse says, 'no longer want to contest the elections' | एकनाथराव खडसे म्हणतात, ‘आता निवडणूक लढविण्याची इच्छा नाही’

एकनाथराव खडसे म्हणतात, ‘आता निवडणूक लढविण्याची इच्छा नाही’

googlenewsNext
ठळक मुद्देअन्यथा भाजपाची काँग्रेस होण्यास वेळ लागणार नाहीभाजपाच्या रावेर विधानसभा क्षेत्राचा शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख प्रशिक्षण कार्यशाळा

फैजपूर, जि.जळगाव : गेल्या १५ वर्षांपासून राज्यात सत्ता आणण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी व मी आम्ही चार लोकांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. कॉंग्रेस सरकारच्या विरोधात पूर्ण वातावरण निर्मिती केली, आमच्या चार लोकांच्या व्यतिरिक्त कोणीही मेहनत घेतली नाही. पण मनात कुठे तरी खंत आहे की राज्यात सरकार आणल,े पण मंत्रीपद सोडावे लागले. माझी आता निवडणूक लढण्याची इच्छा नाही, कारण अशी परिस्थिती कायम राहिल्यास माझा स्वतंत्र निर्णय मी घेण्यास सक्षम असल्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले.
भाजपाच्या रावेर विधानसभा क्षेत्राचा शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख प्रशिक्षण कार्यशाळा फैजपूर येथील खंडेराव वाडी मंगल कार्यालयात सोमवारी सकाळी झाली. त्या कार्यशाळेचे उद्घाटन करताना एकनाथराव खडसे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अस्मिता पाटील, जिल्हा कार्यवाहक अजय सूर्यवंशी होते.
या वेळी एकनाथराव खडसे यांनी सांगितले की, मी नेहमी युतीच्या विरोधात होतो आणि युती तुटली म्हणून १२२ आमदार भाजपाचे निवडून आले. शिवसेना सत्तेत असून सरकारच्या विरोधात बोलते, शिवसेना म्हणते, कर्जमाफीत घोटाळा झाला आहे, ज्यावेळेस कर्जमाफी दिली त्यावेळेस शिवसेना मंत्री त्यात सहभागी होते, मग त्यांनी विरोध का केला नाही? सत्तेत राहायचे, शिव्या द्यायच्या म्हणजे हे एखाद्या खट्याळ बाईसारखे शिवसेनेचे वागणे आहे. मी विरोधी पक्ष नेता असताना कॉंग्रेस राष्ट्रावाडीचे सिंचन घोटाळे बाहेर काढले. मागील कॉंग्रेस सरकारने कामे केली नाही, असे नाही, पण त्यांनी १५ वर्षात पूर्ण देश, राज्य भ्रष्टाचाराने बोकाळले होते. सध्याच्या परिस्थितीत कॉंग्रेस जवळ संघटन नाही, त्यामुळे भाजपाचे आपले संघटन मजबूत करणे गरजेचे आहे अन्यथा आपलीसुद्धा कॉंग्रेससारखी गत व्हायला वेळ लागणार नाही.
प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विलास चौधरी, तर आभार विजय नरवाडे यांनी मानले.


 

Web Title: Eknathrao Khadse says, 'no longer want to contest the elections'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.