अमळनेरात ग्रामसेवकांचा गटविकास अधिकाºयांविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:57 AM2018-09-19T00:57:12+5:302018-09-19T00:59:30+5:30

असंवैधानिक भाषा वापरल्याचा आरोप

Elderly against Gramsevak's Group Development Officer | अमळनेरात ग्रामसेवकांचा गटविकास अधिकाºयांविरुद्ध एल्गार

अमळनेरात ग्रामसेवकांचा गटविकास अधिकाºयांविरुद्ध एल्गार

Next
ठळक मुद्देसोशल मीडियावर असंवैधानिक भाषा वापरत असल्याचा ग्रामसेवकांचा आरोपकारवाई केल्याचा राग आल्याने संघटनेतर्फे दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा गटविकास अधिकाºयांची भूमिका

अमळनेर, जि.जळगाव : ग्रामसेवकांना सोशल मीडियावर असंवैधानिक व अशासकीय भाषा वापरणाऱ्या गटविकास अधिकाºयाविरुद्ध ग्रामसेवक युनियनने एल्गार पुकारला असून, निवेदनाद्वारे बहिष्काराचा इशारा देण्यात आला आहे.
१३ व १६ रोजी प्रभारी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी सोशल मिडियावर व वैयक्तिक व्हॉट्सएप ग्रुपवर निलंबन, चौकशी प्रस्तावित करण्याबाबत धमक्या दिल्या. प्रभारी गटविकास अधिकाºयांनी अतिरिक्त पदाचा उच्छाद मांडला असल्याचा आरोपही संघटनेने निवेदनाद्वारे केला आहे. तसेच आचारसंहिता संपल्यानंतर वेळोवेळी मागणी केल्यावरदेखील प्रशासकीय विनंती बदल्या शासन आदेश असतानाही ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी संवर्गाच्या बदल्या आपण केलेल्या नाहीत, ‘ड’ याद्या सर्वेक्षणाचे कामात कुठलाही आदेश नसताना कामकाज सुरू आहे, परंतु तांत्रिक अडचणींमुळे सदर काम धीम्या गतीने सुरू आहे. तरी सोशल मीडियावर ग्रामसेवकांबाबत असंविधानिक व अशासकीय भाषेचा वापर केला जात आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.
या मानहानीमुळे ग्रामसेवकांचे मनोधैर्य खचले आहे, त्यामुळे हे प्रकार बंद करावेत अन्यथा बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष संजय पाटील, सचिव संजय सैंदाणे, मानद अध्यक्ष जी.एम.पवार, एन.एस.पाटील, एम.एन.ठाकूर, माजी अध्यक्ष दिनेश साळुंखे, डी.के.मोरे यांच्यासह ६४ ग्रामसेवकांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, सभापती वजाबाई भिल व संघटनेच्या राज्याध्यक्षांना देण्यात आल्या आहेत.

कामाच्या बाबतीत अमळनेर तालुका मागे असल्यामुळे कामचुकार ग्रामसेवकांवर कारवाई करणे सुरू केल्याचा राग आल्याने संघटनेतर्फे दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र माझी कारवाई सुरूच राहणार आहे. त्यात माघार घेणार नाही
-संदीप वायाळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अमळनेर



 

Web Title: Elderly against Gramsevak's Group Development Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.