वृद्धेचा झोपेतच जळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:50 PM2017-08-24T12:50:26+5:302017-08-24T12:54:08+5:30
मध्यरात्री घडलेली घटना, पोलिसांनी केला पंचनामा
Next
ठळक मुद्देजिजाबाई सोनवणे ही वृद्धा झोपडीत एकटीच राहत होतीमुलगा गावातच दुसरीकडे वेगळा राहतोकॉईलमुळे आग लागल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज
आ नलाईन लोकमत पारोळा, जि.जळगाव , दि...२४ : झोपडीत राहणाºया जिजाबाई पंडीत सोनवणे (६५) या वृद्धेचा झोपेतच जळून मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री बसस्थानकासमोर असलेल्या पेट्रोलपंपाच्या मागे घडली. जिजाबाई सोनवणे या बसस्थानकासमोरील ए.जी. कुळकर्णी पेट्रोल पंपामागे असलेल्या झोपडीत एकट्याच राहत होत्या. त्या धुणी-भांडी करून, स्वत:चा उदरनिर्वाह करीत होत्या. त्यांचा मुलगा अशोक सोनवणे हा गावातच राजीव गांधी नगरात राहतो. तो खाजगी वाहनावर चालक असून, सध्या तो अजमेरला गेल्याचे सांगण्यात आले.जिजाबाई सोनवणे या रोज पहाटे लवकर उठायच्या. मात्र आज त्या न दिसल्याने, परिसरात राहणाºया मजूर महिलेने त्यांच्या झोपडीजवळ जाऊन बघितले असता, त्यांचा झोपडीतील खाटीवरच जळून मृत्यू झालेला होता. या घटनेची माहिती त्या महिलेने परिसरातील रहिवाशांना दिली. नागरिकांनी पोलीसांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अजितसिंग देवरे, हेड कॉन्स्टेबल बापू पाटील, नाना पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह कुटीर रूग्णालयात नेला.त्या वृद्धेच्या झोपडीशेजारी कोणीच राहत नसल्याने, मध्यरात्रीची घटना कोणाच्या लक्षात आली नाही. दरम्यान त्यांच्या खाटेच्या शेजारी डासांची कॉईल लावलेली होती. त्या कॉईलमुळे आग लागून वृद्धेचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत फक्त झोपडीचे वरचे छत थोडेफार जळालेले आहे. इतर नुकसान झालेले नाही. त्यामुळे पोलीस दुसºया दिशेनेही तपास करीत आहे.याप्रकरणी अद्याप पारोळा पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आलेली नव्हती.