खळ्यातील झोपडीत वृध्दाची गळफास घेवून आत्महत्या
By सागर दुबे | Updated: May 5, 2023 14:57 IST2023-05-05T14:56:54+5:302023-05-05T14:57:03+5:30
शामराव पवार यांचे गावाबाहेर गिरणा नदीकाठाजवळ खळे आहे. गुरूवारी दुपारी ते खळ्यामध्ये गेले होते.

खळ्यातील झोपडीत वृध्दाची गळफास घेवून आत्महत्या
जळगाव : कानळदा येथील एका खळ्यातील झोपडीमध्ये ७२ वर्षीय वृध्दाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. शामराम दौलत पवार (रा.कानळदा, ता.जळगाव) असे मृत वृध्दाचे नाव असून या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शामराव पवार यांचे गावाबाहेर गिरणा नदीकाठाजवळ खळे आहे. गुरूवारी दुपारी ते खळ्यामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी खळ्यातील झोपडीमध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. काही गुरे चारणा-या मुलांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी कानळदा ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्यातील लिलाधर महाजन व ज्ञानेश्वर कोळी यांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात नेला.
याठिकाणी वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती पवार यांना मृत घोषित केले. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समजून आलेले नसून प्राथमिक तपास लिलाधर महाजन करीत आहेत. शुक्रवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.