रस्त्यावर दुचाकी घसरून पासर्डी येथील वृद्ध ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 23:04 IST2021-04-27T23:04:04+5:302021-04-27T23:04:40+5:30
रस्त्यावर दुचाकी घसरल्याने पासर्डी येथील ६५ वर्षीय वृद्ध ठार झाल्याची घटना साेमवारी घडली.

रस्त्यावर दुचाकी घसरून पासर्डी येथील वृद्ध ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
भडगाव : चोपडा येथे भाचीला सोडून घरी परत येत असताना, रस्त्यावर दुचाकी घसरल्याने पासर्डी येथील ६५ वर्षीय वृद्ध ठार झाल्याची घटना दि.२६ रोजी घडली असून, याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पासर्डी येथील निंबा हसरथ पाटील हे भाचीला सोडण्यासाठी चोपडा येथे गेले होते. भाचीला सोडल्यानंतर घरी परतत असताना, नगरदेवळा स्टेशन येथील हॉटेलजवळ त्यांची दुचाकी (एमएच१९सीटी१३५४) ही अचानक घसरल्याने गंभीर मार लागला. यावेळी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला प्रवीण निंबा पाटील (पासर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पो.हे.काँ. कैलास गीते हे करीत आहेत.