उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर निवडणुकीदरम्यान मू.जे. महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:46 PM2018-01-21T12:46:46+5:302018-01-21T12:49:55+5:30
दहा जागांसाठी मतदान
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 21- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांमधून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी रविवारी सकाळी 8 वाजेपासून खान्देशातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील 26 मतदान केंद्रांतील 68 बुथवर मतदानास सुरुवात झाली आहे. या मतदानादरम्यान जळगाव शहरातील मू.जे. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर उमेदवारांची मतपत्रिका देण्यावरून अभाविप कार्यकर्ते व विष्णू भंगाळे यांच्यामध्ये वाद झाला.
सकाळी 8 ते सायंकाळी 5 ही मतदानाची वेळ असून एकूण 400 पेक्षा अधिक कर्मचारी या मतदान कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. नऊ विभागीय अधिका:यांचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे. काही केंद्रावर बैठेपथक कार्यरत आहे.
23 हजार 737 मतदार
10 जागांसाठी खान्देशातून 23 हजार 737 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. 26 केंद्रावर मतदान होत असून जळगाव जिल्ह्यात 15, धुळे मध्ये 6 तर नंदुरबार जिल्ह्यातील 5 केंद्रावर मतदान होणार आहे. 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता विद्यापीठ परिसरातील कर्मचारी भवनात मतमोजणीला प्रारंभ होईल.