सुवर्णनगरीतील सोन्याची भूरळ, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केली जळगावात सोने खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:45 AM2018-04-28T11:45:32+5:302018-04-28T11:46:09+5:30

परंपरा राखली

Election Commission officer purchase gold | सुवर्णनगरीतील सोन्याची भूरळ, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केली जळगावात सोने खरेदी

सुवर्णनगरीतील सोन्याची भूरळ, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केली जळगावात सोने खरेदी

Next
ठळक मुद्देराज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधी प्राजक्ता लवंगारे सराफ बाजारातसोने खरेदीचा मोह

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २८ - मनपाच्या प्रभाग रचनेच्या हरकतींवर सुनावणीसाठी शहरात आलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधी तथा हुडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे यांनी शुक्रवारी हरकतींवर सुनावणी आटोपल्यानंतर सराफ बाजारात जावून सोने खरेदी केली. राज्यभरात शहरातील सुवर्णबाजाराची झळाळी प्रसिध्द आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनाही सोने खरेदीचा मोह आवरता आला नाही. गत निवडणुकीवेळी राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्त निला सत्यनारायण यांनी नवीपेठेतील प्रसिद्ध दुकानात जाऊन साडी खरेदी केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या अधिकाºयांनी जळगावात आल्यावर खरेदीची परंपरा राखली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सायंकाळी ५ वाजता प्राजक्ता लवंगारे यांनी मनपात हरकतींवर सुनावणी घेतल्यानंतर, काही भागात जावून पाहणी केली. त्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास प्राजक्ता लवंगारे या मनपा कार्यालयीन अधीक्षक सुनील गोराणे यांच्यासह सराफ बाजारातील एका सोन्याचा शोरुममध्ये जावून सोने खरेदी करून घेतली. त्यांच्या या खरेदीमुळे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाºयांनी खरेदीची परंपरा कायम ठेवली.
जुन्या आठवणींना उजाळा
२०१३ मध्ये झालेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठीच्या प्रभाग रचना हरकतींच्या सुनावणीसाठी तत्कालीन राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त निला सत्यनारायण जळगावात आल्या होत्या.
त्यांनी देखील प्रभाग रचनेच्या हरकतींवर सुनावणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नवीपेठ भागात नव्यानेच सुरु झालेल्या एका साड्यांसाठी प्रसिध्द असलेल्या दुकानात जावून साड्या खरेदी केल्या होत्या.
विशेष म्हणजे या खरेदीच्यावेळी त्यांच्या सोबत त्यावेळी तत्कालीन मनपा आयुक्त संजय कापडणीस व उपायुक्त भालचंद्र बेहरे हे देखील उपस्थित होते.
तेव्हा निला सत्यनारायण यांच्या सोबत साडी खरेदीचा फोटो ‘लोकमत’ ने प्रसिध्द केल्यानंतर मोठी चर्चा झाली होती. प्राजक्ता लवंगारे यांनी शुक्रवारी सोने खरेदी केल्यानंतर २०१३ मधील जुन्या आठवणी जाग्या झाल्या असेच म्हणावे लागेल.

Web Title: Election Commission officer purchase gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.