महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाइनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:16 AM2021-03-16T04:16:29+5:302021-03-16T04:16:29+5:30
सत्ताधाऱ्यांचे टेन्शन वाढणार : तर नगरसेवक आहे त्याठिकाणाहून करू शकतील मतदान लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाच्या महापौर व ...
सत्ताधाऱ्यांचे टेन्शन वाढणार : तर नगरसेवक आहे त्याठिकाणाहून करू शकतील मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपाच्या महापौर व उपमहापौरपदासाठी गुरुवारी होणारी निवडणूक ही कोरोना प्रादुर्भावामुळे ऑनलाइन पध्दतीने होणार असल्याची माहिती नगरसचिव सुनील गोराणे यांनी दिली आहे. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे काम पाहणार आहेत. सत्ताधारी भाजपमध्ये झालेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पध्दतीने होणार असल्याने सत्ताधाऱ्यांचे टेन्शन वाढणार आहे. तर विरोधकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
महापौरपदाची निवडणूक प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने उमेदवारांव्यतिरिक्त इतर नगरसेवक आहे त्या ठिकाणाहून मतदान करू शकणार आहेत. ही निवड आवाजी मतदानाव्दारे किंवा प्रत्येक नगरसेवकांच्या मंजुरी घेऊन होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन पध्दतीने ही निवडणूक होणार असल्याने नगरसेवकांना मनपात किंवा जळगाव शहरात देखील येण्याची गरज पडू शकत नाही. ज्या ठिकाणी नगरसेवक सभेत सहभागी होवू शकतात, यामुळे या सभेचा फायदा विरोधकांना होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मार्च २०२० पासून मनपाच्या महासभा या ऑफलाइन पध्दतीने होत आहेत. जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोणत्याही सभांना काही संख्येची मर्यादा घातली आहे. त्यानुसार मनपा स्थायी समितीची बैठक ही ऑफलाइन पध्दतीने घेता येत आहे.