तापी परिसर विद्या मंडळ शैक्षणिक संस्थेची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:17 AM2021-09-21T04:17:55+5:302021-09-21T04:17:55+5:30

फैजपूर : येथील तापी परिसर विद्या मंडळ (धनाजी नाना महाविद्यालय) या शैक्षणिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून संस्थाध्यक्ष ...

Election of Tapi Premises Vidya Mandal Educational Institution without any objection | तापी परिसर विद्या मंडळ शैक्षणिक संस्थेची निवडणूक बिनविरोध

तापी परिसर विद्या मंडळ शैक्षणिक संस्थेची निवडणूक बिनविरोध

Next

फैजपूर : येथील तापी परिसर विद्या मंडळ (धनाजी नाना महाविद्यालय) या शैक्षणिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून संस्थाध्यक्ष म्हणून आमदार शिरीष चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

तापी परिसर विद्या मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला होता. या निवडणुकीत सर्व अधिकार आमदार शिरीष चौधरी यांना देण्यात आले होते. त्यानुसार, रविवारी माघारीच्या दिवशी आमदार शिरीष चौधरी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्राचार्य डॉ. व्ही.आर. पाटील यांना पात्र उमेदवारांची नावे दिली. ती यादी वैध धरून प्राचार्य पाटील यांनी पात्र उमेदवारांची तसेच नियामक मंडळ सदस्य यांची नावे घोषित करून निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

बिनविरोध निवड झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे... अध्यक्ष- आमदार शिरीष चौधरी, उपाध्यक्ष- डॉ. एस.के. चौधरी, माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघुळदे, चेअरमन- लीलाधर चौधरी, व्हाइस चेअरमन- प्रा. के.आर. चौधरी, सचिव -प्रा. एम.टी. फिरके, सहसचिव- प्रा. नंदकुमार भंगाळे. या निवडणुकीत सहायक निवडणूक अधिकारी प्राचार्य आर.एल. चौधरी होते. तर, नितीन सपकाळे यांनी सहकार्य केले.

Web Title: Election of Tapi Premises Vidya Mandal Educational Institution without any objection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.