जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी, पाळधी, वराडसीमसह 58 ग्रामपंचायतच्या निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:17 PM2018-02-03T12:17:44+5:302018-02-03T12:22:09+5:30
132 ग्रामपंचायतची पोटनिवडणूक
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 3 - जिल्ह्यातील 58 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 132 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून 25 फेब्रुवारी रोजी मतदान तर 26 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यात मार्च ते मे 2018 मध्ये मुदत संपणा:या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. 12 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून 15 फेब्रुवारीर्पयत माघारीची मुदत राहणार आहे. 25 रोजी मतदान होणार असून 26 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
सार्वत्रिक निवडणूक होणा-या तालुकानिहाय 58 ग्रामपंचायती
जळगाव- नंदगाव, बेळी, करंज, आमोदे बु., धरणगाव- चांदसर बु., पाळधी बु., भोद खु., एरंडोल- भालगाव बु., खडके बु., वरखेडी, वनकोठे, खेडगाव, जामनेर- गोंदखेड, खडकी, तोरनाळे, सामरोद, पहूरपेठ, एकुलती बु., नायदाभाडी, शेंदुर्णी, कापूसवाडी, शहापूर, गोरनाळे-तोरनाळे, दोंदवाडे, पठाडवाडा, गारखेडा खु., शिंगाईत, भुसावळ - चोरवड, गोजोरे, सुनसगाव, वराडसीम, बोदवड- गाळेगाव खु., येवती, यावल - थोरगव्हाण, रावेर- विटवे, चाळीसगाव- रामनगर, खेडगाव, न्हावे, खेरडे, सेवानगर, भडगाव - कनाशी, गोंडगाव, शिंदी, अमळनेर- गोवर्धन, दोधवद, अमळगाव, ढेकूसिम, मंगरूळ, भरवस, लोंढवे, चोपडा- अंबाडे, तावसे खु., नरवाडे, वाळकी, विचखेडे, घुमावल बु., कोळंबे, कठोरे या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तर 132 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होणार आहे.
तालुकानिहाय पोटनिवडणूक होणा-या ग्रामपंचयातींची संख्या
अमळनेर -10, भडगाव -8, रावेर - 20, यावल - 18, पारोळा - 16, पाचोरा - 8, मुक्ताईनगर - 17, जामनेर - 4, जळगाव - 7, एरंडोल - 4, धरणगाव - 7, चोपडा - 6, चाळीसगाव - 4, बोदवड - 2, भुसावळ - 1.