आठवडाभरात आरक्षण रुमसह इलेक्ट्रीक रूम पाडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:14 AM2021-02-15T04:14:47+5:302021-02-15T04:14:47+5:30
जळगाव रेल्वेस्टेशनवर सध्या पाच फ्लॅटफार्मचे काम पूर्ण झाले असून, पाचव्या फ्लॅटफार्मला जोडून शिवाजीनगर बाजूनेही नवीन रेल्वे रूळ टाकण्यात येणार ...
जळगाव रेल्वेस्टेशनवर सध्या पाच फ्लॅटफार्मचे काम पूर्ण झाले असून, पाचव्या फ्लॅटफार्मला जोडून शिवाजीनगर बाजूनेही नवीन रेल्वे रूळ टाकण्यात येणार आहे. यामुळे सुरतकडे जाणाऱ्या विविध एक्सप्रेस व मालगाड्यांना या ठिकाणाहून जाणे सोयीचे होणार आहे. विशेष म्हणजे, यामुळे फ्लॅटफार्म क्रमांक २ व ३ वरील गाड्यांची वर्दळ कमी होणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगरच्या बाजूने संरक्षक भिंतीला लागून प्लॅटफार्मच्या अंतराएवढे नवीन रूळ टाकण्यात येणार आहे.
इन्फो :
इमारती पाडल्यानंतर तात्काळ कामाला सुरुवात
रेल्वे रूळ टाकण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी असलेल्या इलेक्ट्रॉनिक रूम व तिकीट आरक्षण रूम अडथळा ठरत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या रूम पाडण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन ते तीन दिवसांत या कामाला सुरुवात होणार आहे. तसेच या इमारतीमधील कामकाज मालधक्काजवळ उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीतीत स्थलांतर करण्याचे नियोजन असल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले.