नशिराबादकरांना विजेचा शॉक कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:17 AM2021-04-01T04:17:43+5:302021-04-01T04:17:43+5:30
नशिराबादला तहान भागली, अंधार कायम: दीड लाख भरले नशिराबाद : वीज वितरण कंपनीचे पाणी पुरवठ्याचे सुमारे सव्वाकोटी रूपये नशिराबाद ...
नशिराबादला तहान भागली, अंधार कायम: दीड लाख भरले
नशिराबाद : वीज वितरण कंपनीचे पाणी पुरवठ्याचे सुमारे सव्वाकोटी रूपये नशिराबाद ग्रामपंचायतीकडे थकीत होते त्या थकबाकी पोटी ग्रामपंचायतीने सुमारे दीड लाख रुपये धनादेश वीज वितरण कंपनीला सुपुर्द केला आहे. अशी माहिती ग्रामविकास अधिकारी बी.एस.पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली तर थकबाकी पोटी सुमारे दीडलाख रुपये धनादेश वीज वितरण कंपनीला मिळाल्याने गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या दहा ठिकाणचा विज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता पवन वाघुळदे यांनी लोकमतला दिली. तूर्त तरी जलसंकट दिलासा मिळाला आहे.
१४ पैकी दहा ठिकाणचा पाणी पुरवठ्याची वीज पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. सावता नगर,पसायदान केंद्र, नशिराबाद पेठ यास अजून एक असे एकूण चार ठिकाणचा वीज खंडीतच आहे. दरम्यान पथदिवे यांचे सुमारे ८९ लाख रुपये थकीत आहे. त्या बाबतीत कुठलीही रक्कम भरली नसल्यामुळे अद्याप गाव अंधारातच आहे. पथदिवे बंद असल्यामुळे चोरट्यांना अच्छे दिन असल्याचे बोलले जात आहे. गावातील पथदीप तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.