विद्युत अभियंत्यांना भविष्यात उत्तम व उज्वल संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:23 PM2019-09-15T23:23:09+5:302019-09-15T23:25:52+5:30
अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यांचे स्वागत : प्राचार्य डॉ. मॅथ्यू यांचे प्रतिपादन
जळगाव : विद्युत अभियांत्रिकी विद्याशाखेतून ज्ञान घेऊन बाहेर पडलेल्या मनुष्यबळाच्या जोरावर अनेक उद्योगधंद्यातून, मूलभूत कच्च्या मालापासून दर्जेदार, किफायतशीर, पर्यावरणपूर्वक अशी कित्येक गरजेची उत्पादने निर्माण करण्यासाठी मोलाची मदत करणारी ही विद्याशाखा असून विद्युत अभियंत्यांना भविष्यात उत्तम व उज्वल संधी आहे असे मत जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू यांनी विद्युत अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या विध्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमावेळी व्यक्त केले. यावेळी रेसा असोसिएशनच्या नव्या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली़ यात अध्यक्ष हर्षल कुलकर्णी, उपाध्यक्ष सिद्धांत शर्मा, सचिव पराग पाटील, सहसचिव मृणालिनी वानखेडे, क्रीडा समन्वयक सत्यवाण बाहीर, खजिनदार प्राजक्ता आटले, विद्यार्थिनी प्रतिनिधी आरती जगताप, निलेश सोनार, योगेश गिरासे, विध्यार्थी समन्वयक भाग्यश्री वानखेडे, स्वाती गवळी, अदिती शिंदे याची निवड करण्यात आली. यावेळी विभागप्रमुख प्रा.भाग्यश्री पाटील, प्रा.दिपाली पाटील, प्रा.प्रफ्फुल देसले, प्रा. मनीष महाले, प्रा.बिपाशा पत्रा, प्रा.राकेश पाटील उपस्थित होते. तसेच रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रीतम रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी महाविध्यालयात नवीनच दाखल झालेल्या विध्यार्थ्यांचे स्वागत केले.