वीजबिल वसुली कर्मचाऱ्याला मारहाण, ३ महिन्यांची शिक्षा

By विजय.सैतवाल | Published: December 2, 2023 07:50 PM2023-12-02T19:50:49+5:302023-12-02T19:51:01+5:30

पाच साक्षीदार व पंचांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या.

Electricity bill collection employee beaten up, sentenced to 3 months |  वीजबिल वसुली कर्मचाऱ्याला मारहाण, ३ महिन्यांची शिक्षा

 वीजबिल वसुली कर्मचाऱ्याला मारहाण, ३ महिन्यांची शिक्षा

जळगाव : थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी निवृत्ती रामभाऊ बागूल याला दोन कलमांखाली प्रत्येकी तीन महिन्यांची शिक्षा व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. २९ जानेवारी २०२० रोजी वीज वितरण कंपनीचे तीन कर्मचारी निवृत्ती बागूल (रा. राजदेहरे, ता. चाळीसगाव) यांच्याकडे घराच्या व पिठाच्या गिरणीच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी थकीत रक्कम भरण्यास नकार दिला असता कर्मचारी सोमनाथ जाधव हे वीजपुरवठा खंडित करण्यासाठी वीज खांबावर चढले असता बागूल याने त्यांचा पाय धरून खाली ओढले व त्यांना मारहाण केली. तसेच जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत शासकीय कामात अडथळा आणला.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता व दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. यात पाच साक्षीदार व पंचांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. यात जिल्हा व सत्र न्यायाधीश शरद पवार यांनी बागूल यास दोषी धरून कलम ३५३ अन्वये तीन महिने व कलम ३३२ अन्वये तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. तसेच तसेच कलम ५०६ अन्वये ५०० रुपयांचा दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता नीलेश चौधरी यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी सहायक फौजदार हर्षवर्धन सपकाळे यांनी सहकार्य केले.

Web Title: Electricity bill collection employee beaten up, sentenced to 3 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.