जळगाव वगळता दोन जिल्ह्यात वीज बिल भरणा केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:45 AM2020-05-27T11:45:30+5:302020-05-27T11:45:46+5:30

जळगाव : शासनाने वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्याला परवानगी दिल्यानंतर मंगळवारपासून जळगाव जिल्हा वगळता धुळे व नंदुरबार जिल्ह्यात वीजबिल ...

 Electricity bill payment centers started in two districts except Jalgaon | जळगाव वगळता दोन जिल्ह्यात वीज बिल भरणा केंद्र सुरू

जळगाव वगळता दोन जिल्ह्यात वीज बिल भरणा केंद्र सुरू

googlenewsNext

जळगाव : शासनाने वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्याला परवानगी दिल्यानंतर मंगळवारपासून जळगाव जिल्हा वगळता धुळे व नंदुरबार जिल्ह्यात वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मात्र, जळगाव जिल्हा हा रेडझोनमध्ये असल्यामुळे, या ठिकाणी वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी नंतरच ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी खबरदारी म्हणून राज्य शासनाच्या सूचनेनुसार महावितरणतर्फे मार्चच्या दुसºया आठवड्यापासूनचं वीजबिल भरणा केंद्रासह घरोघरी वीजबिलांचे वाटपदेखील बंद करण्यात आले होते. अखेर शासनाने प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. त्यानुसार जळगाव परिमंडळात येणाºया धुळे व नंदुरबार येथे मंगळवार पासून वीजबिल भरणा केंद्र सुरू झाली. मुख्य अभियंत्याच्या सूचनेनुसार या केंद्रावर सॅनिटाईजरची व्यवस्था व सोशल डिस्टनिंगचे पालन करण्यात आले होते. पहिला दिवस असल्याने या केंद्रावर अल्प प्रतिसाद होता. मात्र, दोन महिन्यानंतर वीजबिल भरणा केंद्र सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी दिली.

जिल्ह्यातील केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना महावितरणचे पत्र
जळगाव जिल्हा हा रेडझोनमध्ये असला तरी, प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी सोशल डिस्टनिंगचे पालन करून वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्याबाबत महावितरणतर्फे अधीक्षक अभियंता फारूख शेख यांनी जिल्हाधिकाºयांना पत्र पाठविले आहे. जळगाव शहरात १२ व जिल्ह्यात ७९ वीजबिल केंद्र आहेत. जिल्हाधिकाºयांच्या परवानगी नंतरच महावितरणतर्फे ही केंद्र सुरू करण्यात येणार असून, जिल्हाधिकाºयांच्या परवानगीची प्रतीक्षा करण्यात येत आहे.

Web Title:  Electricity bill payment centers started in two districts except Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.