नगरदेवळ्यात विजेच्या धक्क््याने वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:53 AM2018-10-06T00:53:30+5:302018-10-06T00:58:03+5:30
नगरदेवळा ता. पाचोरा येथील चुंचाळे शिवारातील वीज सयंत्रावर काम करीत असतांना विजेचा धक्का बसून वायरमनचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
नगरदेवळा ता.पाचोरा : येथील चुंचाळे शिवारातील वीज सयंत्रावर वायर जोडणीचे काम करीत असताना वीज कर्मचाºयास विजेचा धक्का बसून त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
पोलीस सूत्रानुसार, रूपेश सुकदेव पाटील (वय २४ रा.तारखेडा ता. पाचोरा) असे या मयत कर्मचाºयाचे नाव असून तो नगरदेवळा वीज मंडळात तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी म्हणून कार्यरत होता.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रूपेश पाटील हा शुक्रवारी सायंकाळी त्याचा सहकारी वायरमन राठोड याच्यासह चुंचाळे शिवारातील शेतकरी ईश्वर संतोष पाटील यांच्या शेतातील विजसंयंत्रावर (डिपी) वायर जोडणीचे काम करीत असताना अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने रूपेश यास जोरदार धक्का लागून तो खाली कोसळला. त्यास शेतकरी बांधव व सहकारी वायरमन यांनी नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले, परंतु वैद्यकिय अधिकाºयांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. या प्रकरणी नगरदेवळा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत रूपेश याच्या पश्चात विधवा आई ,एक भाऊ असा परीवार आहे.
दरम्यान, विज जोडणीसारखे महत्वाचे काम कर्मचारी जिवावर खेळून करीत असतात. ज्या संयंत्रावर काम सुरू असते त्यावेळी त्या संयंत्रासोबतच संपूर्ण परिसराचा वीज संपर्क बंद ठेवण्याचा मेमो असतो. काम पुर्ण झाल्यावर त्यावर काम करणारा कर्मचारी काम संपल्याची सूचना करून मेमो रद्द केल्यावरच वीज संपर्क पुर्ववत करण्यात येतो.
या ठिकाणीही संबंधीत कर्मचाºयांनी मेमो घेतल्याची माहीती मिळाली आहे. तथापि विजपुरवठा सुरू कसा झाला आणि दुर्घटना कशी घडली, याबाबत चर्चा सुरू असून वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे तरुणाला आपला जीव तर गमवावा लागला नाही ना ? अशी शंका व्यक्त होत आहे.