विजेचे दर एकसमान; मात्र विदर्भ व मराठवाड्याला वीज शुल्क माफ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:16 AM2020-12-31T04:16:43+5:302020-12-31T04:16:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वीजदर नियामक आयोगाने सर्व महाराष्ट्रात औद्योगिकचे एकच वीजदर ठेवले आहेत. सध्या राज्यात उच्चदाब व ...

Electricity rates uniform; But Vidarbha and Marathwada are exempted from electricity charges. | विजेचे दर एकसमान; मात्र विदर्भ व मराठवाड्याला वीज शुल्क माफ..

विजेचे दर एकसमान; मात्र विदर्भ व मराठवाड्याला वीज शुल्क माफ..

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वीजदर नियामक आयोगाने सर्व महाराष्ट्रात औद्योगिकचे एकच वीजदर ठेवले आहेत. सध्या राज्यात उच्चदाब व लघुदाबाचे प्रतियुनिट वीजदर ७ रुपये इतके आहे. मात्र, शासनाने विदर्भ व मराठवाड्याला एकूण बिलाच्या साडेसात टक्के वीज शुल्क २०२४ पर्यंत माफ केले आहे, तसेच शासनाकडून विदर्भ व मराठवाड्याला प्रतियुनिट १ रुपया सबसिडी असून, उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांना ५० पैसे सबसिडी आहे. शासनाच्या या धोरणामुळे उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांमध्ये नाराजी आहे. सर्व ठिकाणी विजेचे दर एकसमान असताना, विदर्भ व मराठवाड्याला बिलामागे साडेसात टक्के शासकीय कर लावण्यात येत नाही. मात्र, उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांना हा कर लावण्यात येतो. वारंवार शासनाकडून विदर्भ व मराठवाड्यालाच सवलती देण्यात येत असल्यामुळे उद्योगाला खीळ बसत आहे, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील आौद्योगिक विकास ठप्प झालेला आहे.

Web Title: Electricity rates uniform; But Vidarbha and Marathwada are exempted from electricity charges.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.