वीज उपकेंद्राला ठोकले ‘सील’
By admin | Published: March 17, 2017 12:19 AM2017-03-17T00:19:52+5:302017-03-17T00:19:52+5:30
37 लाख रुपये थकबाकी : एरंडोल महसूल यंत्रणेची कारवाई
एरंडोल : येथील कासोदा रस्त्यालगतच्या गट क्र.597 व 598 मधील 132 के.व्ही. वीज उपकेंद्राला तालुका महसूल यंत्रणेने सील लावण्याची कारवाई गुरुवारी सकाळी केली. या केंद्रासाठी 3.68 हेक्टर जमीन देण्यात आली आहे. तथापि त्यांच्याकडे 37 लाख रु. थकबाकी 4 वर्षापासून असल्याने ही कारवाई करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने एरंडोल वीज उपकेंद्रासाठी जमीन देण्यात आली होती. नागपूर येथील महालेखापाल यांनी सदर जागेचे बाजारमूल्य 37 लाख रु. कमी आकारण्याबाबत शक घेतला होता. त्यानुसार संबंधित कार्यकारी अभियंता यांना 4 वर्षापासून वेळोवेळी नोटिसा देऊनही थकबाकीची रक्कम भरली नाही. म्हणून वसुलीसाठी एरंडोल येथील सहायक अभियंता यांचे कार्यालय सील करण्यात आले. ही कारवाई तहसीलदार सुनीता ज:हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार आबा महाजन, मंडलाधिकारी किशोर माळी, तलाठी शेख यांनी केली. दरम्यान, जळगाव येथील महापारेषण यंत्रणेचे कार्यकारी अभियंता एस.ए. मुंडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.पी. पवार, सहायक अभियंता ए.आर. ढाके यांनी दुपारी तहसीलदार सुनीता ज:हाड यांची भेट घेऊन थकबाकीबाबत चर्चा केली. त्यांनी 10 लाख रु. तूर्तास भरणा करण्याचे मान्य केले. (वार्ताहर)