‘तहसील’चा वीज पुरवठा बंदच
By admin | Published: March 24, 2017 12:32 AM2017-03-24T00:32:25+5:302017-03-24T00:32:25+5:30
जळगाव : वीज बिल न भरल्याने तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा गुरुवारी दुसºया दिवशीही बंद होता.
जळगाव : वीज बिल न भरल्याने तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा गुरुवारी दुसºया दिवशीही बंद होता. वीज बिल भरण्यासाठी अनुदान द्या अशी मागणी तहसीलदारांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
महावितरण कंपनीकडे असलेले कृषक कर आकारणीपोटी तहसील प्रशासनाने २१ लाखांची थकबाकी दाखविली होती. ही बाकी न भरल्याने महावितरणच्या संगणक कक्षाला सील करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष थकबाकी ५ लक्ष २५ हजाराची असल्याचे व त्यात २ लाख २५ हजार महावितरण व ३ लाख पारेषणची असल्याचे लक्षात आणून देण्यात येऊन या रकमेचा धनादेश तहसील प्रशासनास दिल्यानंतर संगणक कक्षाचे सील काढण्यात आले. या बाकीपोटी तहसील प्रशासनाने २७ लाख २६ हजाराचा दंड ठोठावल्याने या विरुद्ध महावितरणने जिल्हाधिकाºयांकडे अपील दाखल केले असून महावितरणची वापरातील जमीन ही सार्वजनिक प्रयोजनाची असल्याने आकारण्यात येत असलेला कराचा दर व त्यावरील दंडाला जिल्हाधिकाºयांकडे अपील दाखल करून आव्हान देण्यात आले आहे.
दरम्यान, तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा सलग दुसºया दिवशी बंद होता. तहसीलचे ४ लाख २४ हजाराचे वीज बिल थकीत आहे. हे बिल व टेलिफोन बिल भरण्यासाठी ६ लाखाचे अनुदान तहसील प्रशासनाने जिल्हाधिकाºयाकडे केली आहे. मात्र केवळ ४ लाखाचे अनुदान मिळाले आहे. तहसीलने आता कोषागार कार्यालयाकडे बिल पाठविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.