अकरावी प्रवेशास उद्यापासून सुरुवात
By admin | Published: June 26, 2017 05:19 PM2017-06-26T17:19:08+5:302017-06-26T17:19:08+5:30
अकरावीसाठी 7 हजार 550 जागा उपलब्ध
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.26- दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल लागल्यानंतर शनिवारी विद्याथ्र्याना दहावी निकालाचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. आता मंगळवारपासून अकरावी प्रवेशास सुरुवात होणार आहे. अकरावीसाठी शहरात 7 हजार 550 जागा उपलब्ध आहेत. त्यात 4 हजार 895 जागा या अनुदानित तुकडय़ांसाठी तर 2 हजार 655 जागा या विनाअनुदानित तुकडय़ांसाठी आहेत.
गेल्यावर्षी अकरावी प्रवेश प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात घोळ झाला होता. मात्र यंदा विद्याथ्र्याना अडचणी येणार नाहीत, यासाठी शिक्षण विभागाकडून अकरावीसाठी 7 हजार 550 जागा उपलब्ध केल्या आहेत. तसेच गेल्यावर्षाच्या तुकडय़ादेखील वाढविण्यात आल्या आहेत. तसेच विद्याथ्र्याची संख्या वाढल्यास जागादेखील वाढविण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी दिली.
अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवस
अकरावी प्रवेशासाठी विद्याथ्र्याना 24 ते 29 जून पर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यात 24 जून रोजी विद्याथ्र्याना दहावीचे गुणपत्रक मिळाल्यामुळे पहिल्या दिवशी काही विद्याथ्र्यानी अर्ज केलेच नव्हते. तसेच 25 रोजी रविवारी व 26 रोजी ईदची सुट्टी आल्याने अर्ज भरण्याचे पहिले तीन दिवस वाया गेले आहेत. त्यामुळे विद्याथ्र्र्याना अर्ज भरण्यासाठी के वळ तीन दिवस आहेत. त्यात अनेक विद्याथ्र्यानी अद्यापर्पयत गुणपत्रक घेतले नसल्याने अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विद्याथ्र्याचा मोठ-मोठय़ा रांगा लागणार आहेत. तसेच अर्ज भरण्यासाठी मुदत वाढविण्याची मागणीदेखील विद्याथ्र्याकडून होत आहे.
3 जुलै रोजी लागणार गुणवत्ता यादी
29 जून र्पयत विद्याथ्र्याना आपले अर्ज महाविद्यालयांमध्ये भरावयाचे आहेत. त्यानंतर विद्याथ्र्याचा टक्केवारीनुसार 3 जुलै रोजी प्रवेशाची पहिली यादी जाहीर होईल. 6 जुलै रोजी पहिल्या यादीतील विद्याथ्र्याना प्रवेश दिले जाणार आहेत. तर 7 जुलै रोजी दुसरी यादी, 10 जुलै रोजी तिसरी यादी लागेल. 13 जुलै र्पयत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. 19 जुलै नंतर रिक्त जागांवर प्रवेश देणे सुरू होणार आहे.