अवैध दारू विरोधात महिलांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 09:50 PM2020-01-23T21:50:26+5:302020-01-23T21:50:36+5:30

वाघोड येथील घटना : संतापाच्या भरात जाळल्या तीन टपऱ्या

Elgar of Women Against Illegal Alcohol | अवैध दारू विरोधात महिलांचा एल्गार

अवैध दारू विरोधात महिलांचा एल्गार

Next


केºहाळे, ता. रावेर : वाघोड येथे बेकायदेशीररित्या भर चौकात अवैध दारूची विक्री होत असलेल्या तीन टपºया संतप्त महिलांनी जाळल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. बेकायदेशीर दारू विक्री विरोधात गावातील महिलांचा संयमाचा बांध फुटला व संतप्त महिलांनी या घटनेला मूर्त स्वरूप दिले .
पोलिस विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने रणरागिणींनी स्वत: रूद्रावतार धारण केला व सायंकाळी वाघोड गावात अवैध दारू विक्री करणाºया दारू विक्रेत्यांच्या टपºया जाळल्या. दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असून गावात दारूबंदी असतांना अवैध दारू विक्रेत्यांचा धंदा जोमाने सुरू होता. पोलिस विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने महिलांचा संताप अनावर झाला होता. अवैध धंदेवाल्यांवर कारवाईची मागणी होत असतांना थातूरमातूर कारवाई करून सोडून देण्यात येते, असा आरोप होत आहे. या विरोधात सायंकाळी महिलांनी एकत्र येत अवैध दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गावातील तीन टपºया जाळून दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महिलांनी आक्रमक रूप धारण करत कारवाईची मागणी केली.
पाच वषार्पूर्वी बाटली आडवी
सुमारे पांच वषार्पूर्वी या गावात दारूच्या विरोधात रुद्ररुप धारण करीत शासनमान्य दारूचे दुकान बंद करून तालुक्यात लौकिक मिळवला होता. तरीही पोलिसांच्या आशीवार्दाने बेकायदेशीर दारूला आंगण मोकळे करण्यात आल्याचा प्रकार सुरू होता . या सर्व प्रकाराला कंटाळून महिलांनी सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकाराला त्रासून स्वत:च धाडस करून दारूचे विक्री केंद्र असलेल्या टपºतया जाळून प्रशासनाला आहेर दिला .
दारू पिणाऱ्यांची आरडाओरड, घरात पैसे न देता दारू पित महिलांना मारहाण करणे आदी प्र्रकार वाढले होते. दारू पिऊन कुटुंब अधोगतीला नेऊन मुलांच्या भविष्याचा विचार न करणे हा त्रास दिवसागणिक वाढतच होता. दारूबंदी करूनही फायदा होत नसल्याने महिलांच्या संयमाचा बांध सुटला व त्यांनी रणरागिणीचे रूप धारण करत आपल्या रूद्रावताराचे दर्शन घडविले.दारुसह इतर अवैध धंद्यांनी पुन्हा जोर धरला आहे. या कडेही वरिष्ठांनी लक्ष देह गरजेचे आहे, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

Web Title: Elgar of Women Against Illegal Alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.