कर्ज वसुलीच्या खोट्या नोंदी करून ५१ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:12 AM2021-07-09T04:12:37+5:302021-07-09T04:12:37+5:30

लेखा परीक्षक सहकारी संस्था, भडगाव योगेश वळवी यांची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम ८१(३)(क) नुसार पिंपळवाड म्हाळसा विविध ...

Embezzlement of Rs 51 lakh by making false records of debt recovery | कर्ज वसुलीच्या खोट्या नोंदी करून ५१ लाखांचा अपहार

कर्ज वसुलीच्या खोट्या नोंदी करून ५१ लाखांचा अपहार

Next

लेखा परीक्षक सहकारी संस्था, भडगाव योगेश वळवी यांची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम ८१(३)(क) नुसार पिंपळवाड म्हाळसा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे लेखा परीक्षण करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होते. वळवी यांनी या संस्थेचे लेखा परीक्षण केले असता, या लेखा परीक्षणात अफरातफर, गैरव्यवहार व गैरविनियोग केल्याचे उघडकीस आले आहे.

पिंपळवाड म्हाळसा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन सचिव, अध्यक्ष व संचालकांनी संस्था सभासदांना कर्ज येणे बाकी निरंकबाबत दाखले दिलेले, बेकायदेशीर परस्पर कर्ज वाटप दर्शवून रकमेचे चेक व विड्राॅलवर खोट्या आणि बनावट सह्या करून कर्ज रकमेची स्वत:चा फायदा संस्थेच्या कर्ज खतावणीला गिरवागिरव करून प्रत्यक्षात कर्ज वसुली रजिस्टर व रोजकिर्दला वसूल जमा न करता बँकेत प्रत्यक्ष चेक वटलेले असताना घनादेश जमाबाबत खोट्या नोंदी करून यात दर्शविलेली बोगस कर्ज वसुलीच्या खोट्या नोंदी करून येणे कर्ज बाक्या कमी किंवा शून्य रुपये असा २३ लाख २ हजार ३४३ रुपयांचा अपहार केला.

तसेच खत दुकानात २ लाख ३३ हजार ४६० रुपयांची अफरातफर केली आहे. त्यानंतर सोसायटीची इमारत बांधकाम तसेच दुरुस्तीचे कामकाज झालेले नसताना खर्चापोटी १ लाख ८ हजार रुपये ही रक्कम दर्शवून ही रक्कम स्वत:साठी वापरून सचिव, अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी संस्थेचा रकमेचा अपहार केला.

शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ व महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अशा दोन्ही कर्जमाफी व कर्जमुक्ती योजनांमध्ये प्रत्यक्षात वाटप नसलेल्या कर्ज रकमेच्या चुकीच्या व खोट्या नोंदी करून शासनाची दिशाभूल करून हेतुपुरस्सर समावेश केला. त्यापैकी शासनाकडून २० सभासदांची २ लाख ७१ हजार ८०० रुपये वजा जाता एकूण १४२ सभासदांची रक्कम मुद्दल १८ लाख ६८ हजार ८५० रुपये व व्याज रुपये ६ लाख १६ हजार ९५९ रुपये ४७ पैसे असे एकूण २४ लाख ८५ हजार ८०९ रुपये ४७ पैसे एवढी रक्कम शासनाची दिशाभूल सचिव पदाचा दुरुपयोग करून ती रक्कम शासनाकडून मिळवून ती शासनाची रक्कम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा टाकळी प्र. दे. ता. चाळीसगाव या बँकेत संस्थेच्या कर्ज खात्यात जमा करून ती रक्कम व त्यावरील व्याज शासनास परत करणे असताना ती जमा केली नाही.

आरोपींनी संगनमत करून १ एप्रिल २०१५ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत बँक धोरणाच्या असलेल्या नियमांचे पालन न करता संस्थेचे २६ लाख ४३ हजार ८०३ रुपये व शासनाचे २४ लाख ८५ हजार ८०९ रुपये ४७ पैसे असे एकूण ५१ लाख २९ हजार ६१२ रुपये ४७ पैसे या रकमेचा अपहार केल्याने बँकेचे संचालक वासुदेव माळी, दिगंबर पाटील, कैलास चौधरी, प्रकाश माळी, बेबाबाई माळी, शेनपडू पाटील, एकनाथ पाटील, चिंतामण अहिरे, दयाराम माळी, लक्ष्मण माळी, सखाराम तिरमली, सुकदेव पाटील, शोभा पाटील, रामचंद्र पाटील तसेच आर. एल. वाघ, बी. पी. साळुंखे व डी. यू. पवार अशा १७ जणांच्या विरोधात मेहूणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Embezzlement of Rs 51 lakh by making false records of debt recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.