अमळनेरातील स्थिती : कट्टर समर्थक आणि नंतर कट्टर वैरीही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:42 PM2019-04-11T12:42:50+5:302019-04-11T12:43:20+5:30

अनिल पाटील, उदय वाघ यांच्यात होती स्पर्धा

Emergency: The fanatic supporter and then the fierce foe ... | अमळनेरातील स्थिती : कट्टर समर्थक आणि नंतर कट्टर वैरीही...

अमळनेरातील स्थिती : कट्टर समर्थक आणि नंतर कट्टर वैरीही...

Next

जळगाव : एकेकाळी माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेले भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ गेल्या काही वर्षात अमळनेरातील स्थानिक व जिल्ह्यातील पक्षाच्या अंतर्गत राजकारणामुळे इतके दूर गेले की आजच्या स्थितीत दोघे एकमेकांचे कट्टर वैरी अशीच ओळख दोघांबाबत सांगितली जात आहे. त्याचे पर्यावसान अमळनेरातील व्यासपीठावरील हाणामारीत झाल्याचे समोर आले आहे.
अमळनेरातील राजकीय वाटचालीचा विचार करता डॉ. बी.एस. पाटील हे १९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर सलग तीन पंचवार्षिक ते या मतदार संघातून आमदार होते. १९९५ च्या कालखंडात त्यांचे उजवे व डावे म्हणून परिचित होते ते अनिल भाईदास पाटील व भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे दोघे.
बी.एस.पाटील-उदय वाघ विळ्या भोपळ्याचे नाते
१९९५ नंतर हळू हळू उदय वाघ व अनिल पाटील यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. ते इतके वाढले की उदय वाघ हे डॉ. बी.एस. पाटील यांच्यापासून दूर जाण्यास सुरूवात झाली. त्यांनी तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जवळ जाण्यास सुरूवात केली. त्यानंतर बी.एस.पाटील हे भाजपाचे जिल्हाध्यक्षही झाले. त्यांना पक्षाने २००७ मध्ये झालेल्या एरंडोल लोकसभा निवडणुकीची उमेदवारीही दिली होती मात्र ते त्यावेळी पराभूत झाले. दरम्यान भाजपातील पक्षांतर्गत राजकारणात गटबाजी वाढत गेली. यात डॉ. बी.एस. पाटील, अनिल भाईदास पाटील व उदय वाघ असे तीन गट निर्माण झाले व तिघांमधील वितुष्ट हे टोकाला गेले. पक्षांतर्गत कलहामुळे व उदय वाघ यांचे पारडे पक्षात जड झाल्याने दुखावलेले डॉ. बी.एस. पाटील यांनी भाजपाला त्यागून काही काळ कॉँग्रेसमध्ये घालविला. नंतर ते पुन्हा स्वगृही परतले.
स्मिता वाघ यांच्या उमेदवारीने नाराजी
लोकसभा निवडणुकीत पक्षाने आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यावर पक्षांतर्गत जणू उद्रेकच झाला. स्वत: गिरीश महाजन हेदेखील नाराज होते. उमेदवारी डावलली गेल्याने खासदार ए.टी. पाटील यांनी याबाबतच्या कटाचा आरोप उदय वाघ यांच्यावरच केला होता. त्या पाठोपाठ बी.एस. पाटील यांनी ए.टी. पाटील यांना समर्थन दिले. अमळनेरातून भाजपाचे सहयोगी आमदार शिरीष पाटील यांनीही बंडाचे निशाण हाती घेतले होते. या सर्व नाराजीचे पर्यावसान स्मिता वाघ यांची उमेदवारी कापली गेली. तेव्हापासून उदय व स्मिता वाघ हे नाराज होते. पक्षाच्या कार्यक्रमांना जाणेही त्यांनी टाळले. मात्र अमळनेरात मेळावा असल्याने उदय वाघ हे अमळनेरला आले. बी.एस. पाटील यांना व्यासपीठावर घेण्यास त्यांचा विरोध होता मात्र गिरीश महाजन यांनी डॉ. पाटील यांना व्यासपीठावर घेतले व त्यातूनच हाणामारीचा प्रकार घडला.

Web Title: Emergency: The fanatic supporter and then the fierce foe ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.