पालिकेच्या कर्मचा:यांना शिवीगाळ करणा:याविरुद्ध गुन्हा
By admin | Published: January 6, 2017 12:53 AM2017-01-06T00:53:59+5:302017-01-06T00:53:59+5:30
अमळनेर : कर्मचा:यांनी काही वेळ केली निदर्शने
अमळनेर : उघडय़ावर शौचास बसणा:याचे शूटिींग व फोटो काढल्याचा राग आल्याने संबंधितांने गुरुवारी नगरपालिकेत जाऊन कर्मचा:यांना शिवीगाळ केली. तसेच एकास मारहाण केल्याची घटना सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेचा निषेध म्हणून कर्मचा:यांनी पालिकेसमोर निदर्शने केली. दरम्यान, कर्मचा:यांना शिवीगाळ, मारहाण करणा:याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, संतोष शांताराम भोई याने गुरुवारी सकाळी 11.30 वाजता नगरपरिषदेत येऊन उघडय़ावर शौच करताना फोटो व शूटिंग का केले असे म्हणत पालिकेतील काही कर्मचा:यांना शिवीगाळ केली. याबाबत बोलायला गेले असता अविनाश संदानशिव (वसुली लिपिक) यांच्या गालावर नखाने ओरबडून रक्तबंबाळ केले आणि डाव्या हातास चावा घेतला.
दरम्यान, कर्मचा:यांना मारहाण करताच काही वेळ कर्मचा:यांनी एकत्रित येऊन न.पा.समोर निदर्शने केली. त्यानंतर मुख्याधिकारी पी.जी. सोनवणे यांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर कर्मचा:यांनी निदर्शने मागे घेतली. या वेळी सोमचंद संदानशिव, महेश जोशी, श्रीकांत बि:हाडे, संतोष बि:हाडे, युवराज चव्हाण, शेखर देशमुख, चंद्रकांत शिंगाणे, संजय चौधरी, ज्ञानेश्वर संदानशिव, जयेश जोशी, प्रतीक्षा निकुंभे, संजय चौधरी, चंद्रकांत संदानशिव, भाऊसाहेब देशमुख, श्यामकुमार करंजे, शेखर देशमुख हजर होते.
गुन्हा दाखल
याबाबत अविनाश संदानशिव यांनी अमळनेर पोलिसात फिर्याद दिल्यावरून संतोषविरुद्ध भादंवि कलम 353, 324, 323, 504 प्रमाणे शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल सुभाष भामरे करीत आहेत.
(वार्ताहर)