चहार्डी शाखेचा कारभार एक कर्मचा:यावर भार
By admin | Published: May 24, 2017 12:07 PM2017-05-24T12:07:38+5:302017-05-24T12:07:38+5:30
चहार्डी येथे जिल्हा बॅँकेच्या शाखेत पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याची मागणी होत आहे.
Next
ऑनलाईन लोकमत
चोपडा,दि.24 - तालुक्यातील चहार्डी येथे जिल्हा बॅँकेच्या शाखेचे 20 हजार सभासद आहेत. त्यामुळे बॅँकेत ग्राहकांची सारखी गर्दी असते. मात्र या बॅँकेत केवळ एकच कर्मचारी असून, त्यांनाच सर्व कामे करावी लागतात. या शाखेत पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याची मागणी होत आहे.
येथील जिल्हा बँक शाखेत चहार्डी येथील 8 हजार शेतकरी, मोरधुपे आणि घाडवेल येथील दोन हजार शेतकरी असे एकूण दहा हजार शेतकरी सभासद व इतर दहा हजार असे एकूण 20 हजार सभासद आहेत. तसेच दोन हायस्कुल मधील जवळपास 150 कर्मचा:यांचे पगार, दोन जिल्हा परिषद शाळांमधील कर्मचारी यांच्यासह अनेकांचे आर्थिक व्यवहार या बँकेत होत असतात. या बँकेत चार कर्मचारी आवश्यक असतांना सध्या एकच कर्मचारी आहे. त्यांनाच सगळे कामे करावी लागत असल्याने ग्राहकांची अडचण होत आहे. मंजुर पदाएवढे कर्मचारी मिळावेत, अशी मागणी सहायक शाखा प्रमुख आर.आर. पाटील यांनी बॅँक प्रशासनाकडे पत्राद्वारे केली. मात्र त्या पत्राची दखल घेतली गेली नसल्याने, येथील शाखा पूर्णपणे दुर्लक्षित आहे.
मंजूर मनुष्यबळ मिळावे
सध्या बँकेत मी एकटा असून, तीन टेबलवर मला काम करावे लागते. त्यामुळे दमछाक होते. गरजे एवढे कर्मचारी मिळाल्यास काम चांगले करता येईल, असे सहायक शाखा प्रमुख आर.आर.पाटील यांनी सांगितले.