मुक्ताई साखर कारखान्यात कामगारांची कपात

By admin | Published: February 9, 2017 12:32 AM2017-02-09T00:32:07+5:302017-02-09T00:32:07+5:30

कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात : ऊस नसल्याने पगार न परवडणारा

Employees' deduction in Mukutai sugar factory | मुक्ताई साखर कारखान्यात कामगारांची कपात

मुक्ताई साखर कारखान्यात कामगारांची कपात

Next

मुक्ताईनगर :  मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड एनर्जी प्रा लि. येथील काही कामगारांना कामावरून कमी करण्यात आल्याने काही कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. बुधवारी  काही कामगारांनी कारखान्याचे चेअरमन डॉ. शिवाजी जाधव यांना भेटून कामावर घेण्याची मागणी केली.
तीन वर्षांपूर्वीच संत मुक्ताई साखर कारखान्याचे मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड एनर्जी प्रा. लि.चा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात नोकर भरती करण्यात आली. त्यात काही हंगामी तर काही कायमस्वरूपी कामगारांची भरती करण्यात आली. गेल्या काही दिवसांपूर्वीच जवळपास २०० हंगामी कामगारांना कामावरून कमी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे तर नंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी जवळपास  कायमस्वरूपी ३५ कामगारांना कमी करण्याचे आदेश कारखाना प्रशासनातर्फे  देण्यात आले. त्यामुळे कामगारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे ज्यांना  कामावरून कमी करण्याचे आदेश दिले आहेत त्यांनाच राजीनामा देण्याचेही सांगण्यात आले आहे व यानंतर पुन्हा एक यादी कामगारांची कमी करण्याची निघणार असल्याचे सांगण्यात आले. या विषयावरून बुधवारी   दुपारी काही कामगारांनी कारखान्याचे चेअरमन डॉ.शिवाजी जाधव यांची भेट घेतली. त्यात रामनाथ धोबी, राजाराम पाटील, अंबालाल अहिरराव, संजय झांबरे, शरद सोनवणे, अंकुश पाटील, आशिष शेजाळे, राज गुप्ता यांचा समावेश होता.
कारखाना  खाजगी  असल्याने व ऊस नसल्याने पगार देणे परवडत नाही म्हणून कामगार कपात केल्याचे जाधव यांनी सांगितले असे एका कर्मचाºयाने  सांगितले.  एका कर्मचाºयाने आमचे पगार व अनुभव दाखले अडकले असल्याने आमचे हात बांधले असल्याची हतबलता व्यक्त केली. कामावर न घेतल्यास कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे सांगण्यात आले.
कोणत्याही कर्मचाºयांचे वेतन थकलेले नाही. आज १५ ते २० कामगार माझ्याकडे आलेले होते त्यांंनी त्यांंचा रजेचा पगार व ओव्हरटाईम या वेतनाबाबत चर्चा करुन मागणी केली मी तत्काळ संंबंंधीतांना वेतनाची रक्कम देण्यास सांंगितले. ज्या कर्मचाºयांनी फंडाची रक्कम मागणी केलेली आहे त्या कर्मचाºयांना तुम्ही राजीनामा दिल्यावरच ती रक्कम मिळेल असे सांंगितले. जे ब्रेक दिलेले हंंगामी कर्मचारी आहेत त्यांंना पुढच्या हंंगामात कामावर परत घेण्यात येईल
- डॉ.शिवाजी जाधव, चेअरमन, मुक्ताई साखर कारखाना, घोडसगाव,ता.मुक्ताईनगऱ

Web Title: Employees' deduction in Mukutai sugar factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.