भुसावळ पालिकेत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 06:03 PM2018-12-16T18:03:44+5:302018-12-16T18:05:21+5:30
नगरपरिषद कर्मचारी संघटनेतर्फे शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
भुसावळ, जि.जळगाव : नगरपरिषद कर्मचारी संघटनेतर्फे शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पालिकेतील अधिकारी, कर्मचाºयांसह सफाई कामगार सहभागी झाले.
सातवा वेतन आयोग राज्यसरकारी कर्मचाºयांसह पालिका कर्मचाºयांना लागू करावा, रोजंदारी कर्मचाºर्यांना त्वरित कायम करावे, वसुलीची अट वगळून पालिकेस १०० टक्के अनुदान देण्यात यावे, २००५ नंतरच्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वारस हक्काप्रमाणे अनुकपाधारकांना तत्काळ सेवेत सामावून घ्यावे या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनात येथील नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजू खरारे, उपमुख्याधिकारी एस.जी.देशपांडे, कार्यालय अधीक्षक अख्तर खान, लेखपाल संजय बनाईते, कर अधीक्षक शेख परवेज अहमद, शेख रफिक, किरण मंदवाडे, अनवर शेख, प्रकाश कोळी, राजेश पाटील, देवीदास नेमाडे, श्याम गिरी, नरेंद्र पाटील, प्रमोद मेढेंसह सफाई कर्मचारी सहभागी झाले होते.
या आंदोलनात नगर परिषद कर्मचाºयांनी एकजूट दाखविली. या धरणे आंदोलनावेळी कामबंद ठेवण्यात आले होते. निर्णय न झाल्यास २९ डिसेंबर रोजी काळ्याफिती लावून काम करून शासनाचा निषेध करणे, ३१ डिसेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १ जानेवारीपासून संपूर्ण राज्यभर नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.