कर्मचा-यांचे प्रश्न लवकरात लवकर सुटण्‍यासाठी पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 06:37 PM2020-09-26T18:37:11+5:302020-09-26T18:37:26+5:30

सुप्रिया सुळे : विद्यापीठ कर्मचा-यांशी साधला व्हीडिओ कॉलद्वारे संवाद

Employees' questions will be followed up for early release | कर्मचा-यांचे प्रश्न लवकरात लवकर सुटण्‍यासाठी पाठपुरावा करणार

कर्मचा-यांचे प्रश्न लवकरात लवकर सुटण्‍यासाठी पाठपुरावा करणार

Next

जळगाव : महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन आयोग व सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे प्रश्न‍ आठवडाभराच्या आत सुटण्याच्या दृष्टीने राज्याचे वित्त व नियोजन मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण राज्य मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव यांच्यासह महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठक येत्या दोन तीन दिवसात निश्चित करून प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सुटावे, यासाठी पाठपुरावा करणार असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ठिय्या आंदोलन करणाऱ्या विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शनिवारी व्हीडीओ कॉलवरून दिले.

विद्यापीठातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या तिन्ही संघटनांच्या सदस्यांनी शनिवारी सलग तीसऱ्या दिवशी विद्यापीठाच्या प्रवेशव्दाराजवळ द्वारसभा घेऊन निदर्शने करीत शासनाच्या आडमुठे धोरणाच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जळगाव महानगर जिल्हा अध्यक्ष अभिषेक पाटील, अ‍ॅड कुणाल पवार, स्वप्नील नेमाडे यांनी आंदोलनास पाठींबा दिल्याचे जाहीर केले. अभिषेक पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी व्हीडीओकॉलद्वारे करून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसह सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले दोन शासन निर्णय पुनर्जिवित करणे, १०,२० व ३० वर्षांच्या सेवेनंतरची तीन लाभांची योजना लागू करण्यासंदर्भात वित्त, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री, सचिव व कृती समितीच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक २९ किंवा ३० सप्टेबर रोजी आयोजित करण्याच्या संदर्भात त्यांनी वित्त मंत्र्यांच्या विशेष कार्यआधिकारी यांच्याशी चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाच्या पुर्ततेसाठी स्वत: अजित पवार यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी होईपर्यंत पाठपुरावा करेल अशी ग्वाही दिली.
 

Web Title: Employees' questions will be followed up for early release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.