ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांनी घर अन् घर पिंजून काढले - डॉ.दिलीप पाटोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 11:39 PM2020-04-21T23:39:59+5:302020-04-21T23:40:24+5:30

बाहेरून आलेल्या ४२ हजारजणांची तपासणी

Employees ransacked houses in rural areas | ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांनी घर अन् घर पिंजून काढले - डॉ.दिलीप पाटोडे

ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांनी घर अन् घर पिंजून काढले - डॉ.दिलीप पाटोडे

googlenewsNext

आनंद सुरवाडे
ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांनी सर्व्हेक्षण करून घर अन् घर पिंजून काढून सर्व्हेक्षण केले व आज जिल्हाभरातील ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या संपूर्ण मोहीमेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ दिलीप पोटोडे यांच्याशी साधलेला संवाद...
परिस्थिती कशी व आपले नियोजन कसे?
सध्या परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात आहे़ वरिष्ठ पातळीवरून ते सर्वच कर्मचारी पूर्ण झोकून काम करीत आहे़ सर्व विभागांच्या समन्वयातून ग्रामीण भागांमध्ये सर्व्हेक्षण, होम कवारंटाईन, तपासण्या ही कामे सातत्याने पूर्ण वेळ सुरूच आहे़ त्याचे अहवाल नियमित वरिष्ठ पातळीवर पाठविले जात आहे़ विदेशासह परराज्यातून आलेल्या ५०८ जणांवर जिल्हा आरोग्य विभाग सर्व तालुका आरोग्य अधिकारी व सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पूर्ण वेळ लक्ष ठेवून त्यांची तपासणी करून घेतली़ यासह ४२ हजार जे लोक बाहेरून आलेले होते़ त्यांचा १४ दिवसांचा कालावधी संपलेला आहे़ त्यामुळे सर्वांचा समन्वय व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गर्दशनाने परिस्थिती नियंत्रणाखाली आहे़
मास्क व पीपीई किटची परिस्थिती कशी?
आरोग्य सेविका, अंगणवाडी व आशा स्वयंसेविका या घरोघरी जावून सर्व्हेक्षण करीत आहे़ त्यांना सद्य स्थितीत पुरेसे मास्क, सॅनिटायझर उपलब्ध आहे़ मात्र, आधी तुटवडा असतानाही त्यांनी त्यांच्या जबाबदाºया पार पाडल्या़ पीपीई किट हे केवळ रूग्णांवर उपचार करणाºयांनाच आवश्यक असल्याने स्थानिक पातळ्यांवर ते नाहीत मात्र, थ्री लेअर मास्क व सॅनेटायझर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत़
सारीच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभाग पूर्णत: सज्ज आहे़ मुळात रूग्ण दाखल केले जातात ते सारी व कोविड संशयित म्हणून त्यांच्या दोन तपासण्या केल्या जातात़ त्यात कोविड व सारी अशा या दोन तपासण्या असतात़ मृत्यू झालेल्या रूग्णांचे सारीचे अहवाल निगेटीव्ह आहेत़ त्यामुळे सद्य स्थितीत सारीचा रूग्ण जिल्ह्यात नाही़
जनजागृती कशा प्रकारे केली?
ग्रामीण भागात घरोघरी हस्तपत्रके वाटली़ बॅनर्स लावण्यात आली़ घंटागाड्यांवर झिंगल वाजविल्या़ जनजागृतीवर मोठ्या प्रमाणावर भर दिला गेला़ आलेल्या निधीतून हे जनजागृतीचे काम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आले़ सर्व्हेक्षणादरम्यान जनजागृतीवर अधिक भर देण्यात येत असतो़ जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे हे सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन नियमावली सांगत असतात़
वैद्यकीय अधिकाºयांना मार्गदर्शन करणे, आरोग्य केंद्रांना भेटी देऊन पाहणी करणे, वस्तुस्थिती पडताळणे यावर लक्ष ठेवून आहे़ - डॉ.दिलीप पाटोडे

Web Title: Employees ransacked houses in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव