एस.पींच्या दराऱ्याने कर्मचारी धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 07:09 PM2018-10-13T19:09:30+5:302018-10-13T19:09:52+5:30
अंतर्गत शिस्त व अवैध धंद्यांना विरोध
सुनील पाटील
जळगाव : पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रुजू झाल्यापासून अंतर्गत शिस्त व अवैध धंद्यांना विरोध या दोन बाबींना प्राधान्य दिले आहे. दोन्ही निर्णय योग्य असले तरी अंतर्गत शिस्तीच्या बाबतीत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयात येताना गणवेश व हेल्मेट सक्तीला बहुतांश अधिकारी व कर्मचाºयांचा विरोध आहे. कडक शिस्तीचे अधिकारी अशी ओळख असल्याने शिंदे यांच्यापर्यंत येऊन याबाबत कोणीही उघड बोलायला तयार नाही किंवा पोलीस अधीक्षकांना विरोध करण्यासाठी कोणीही पुढे सरसावत नाही.
महामार्गावर वापरताना हेल्मेट सक्ती एक वेळ चालेल, मात्र मुख्यालयात सक्ती म्हणजे अतिरेकच आहे. त्यामुळे अन्य भानगडीत न पडणारे कर्मचारीही कमालीचे धास्तावले आहेत. अवैध धंद्याच्या बाबतीत संबंधित अधिकारी व कर्मचारी दुखावले आहेत, परंतु त्याही पेक्षा जास्त कर्मचारी पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेने सुखावले आहेत. धंदे बंदचा आव आणला जात असला तरी जिल्ह्यात धंदे सुरुच असल्याचे वेळावेळी झालेल्या कारवायांमधून सिध्द होत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात आस्थापना, विभागीय चौकशी व इतर ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात कर्मचाºयांची अडवणूक होते. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत तर आस्थापना विभागाने तर दुकानच मांडले होते. या सर्व दुकानदारांची दुकानदारीला शिंदे यांनी चाप लावला आहे. हा निर्णय कौतुकास्पद होत आहे. गणवेश व हेल्मेट सक्तीमुळे कर्मचारी कमालीचे तणावात आहेत.दुर्देवाने एखादी घटना अथवा दुर्घटना घडली तर त्याचे खापर नक्कीच पोलीस अधीक्षकांच्या नावाने फोडले जाईल, यात शंका नाही. तत्कालिन पोलीस उपअधीक्षक दिलीप शंकरवार यांच्याबाबतीत असाच प्रकार घडला होता. त्यांच्याबाबतील सामान्य नागरिक व कर्मचाºयांमध्ये प्रचंड रोष होता. शेतकरी मृत्यूप्रकरण त्यांच्यावर चांगलेच शेकले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी काही गोष्टींचा अतिरेक थांबविला पाहिजे असे मत काही कर्मचाºयांचे आहे.