चोपडा महाविद्यालयात आयोजित रोजगार मेळाव्यातून १० विद्यार्थ्यांना मिळाला रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 06:45 PM2018-08-18T18:45:44+5:302018-08-18T18:46:16+5:30
रोजगार मेळावे नित्याने घेण्याची अपेक्षा
चोपडा, जि.जळगाव : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. संबंधित कंपनी आणि महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा घेण्यात आला.
या वेळी कंपनीकडून अधिकाऱ्यांनी पात्र ९० विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. यात १० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड.संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ.स्मिता संदीप पाटील, प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली.
या वेळी संबंधित कंपनीचे अधिकारी शेख मगदूम युसुफ, उमाकांत मोरे, सुधाकर डालके, दयानंद माने, तेजस परदेशी व ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल समन्वयक डॉ.कुणाल गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी अॅड.संदीप पाटील, प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी मनोगते व्यक्त केली. डॉ.आर.आर.पाटील यांनी सूत्रसंचालन, तर आभार प्रा.डी.डी. कर्दपवार यांनी मानले.