जळगावात 6 ऑक्टोबर रोजी रोजगार व उद्योजकता मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:16 PM2017-10-01T13:16:26+5:302017-10-01T13:16:54+5:30
सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 1 - जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 6 ऑक्टोबर रोजी मेस हॉल, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (आय.टी.आय ) जळगाव या ठिकाणी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील एकूण 9 उद्योजक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. त्यांच्यामार्फत एकूण 603 रिक्त पदांसाठी मुलाखत घेण्यात येणार आहे.
उद्योग व्यवसाय व स्वंयरोजगारासाठी कर्जसहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून शासनाच्या कौशल्य विकास अभियानांतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण मार्गदर्शनासाठी जिल्हयातील व्यवसाय प्रशिक्षण संस्था (व्हि.टी.पी) उपस्थित राहणार आहेत.