छत्र हरपलेल्या कुटुंबीयांसाठी रोजगारनिर्मितीची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 09:08 PM2020-01-04T21:08:16+5:302020-01-04T21:08:20+5:30
विद्यार्थ्यांना शिक्षणात मदतीचा हात । पद व प्रसिद्धी न करता सरस्वती मिशनची व्रतस्थ समाजसेवा
पाचोरा : प्रसिद्धीसाठी वाटेल ते करणा?्या आणि प्रत्येक क्षणी धडपडणाऱ्या सामान्य माणसांच्या या युगात प्रसिद्धीपासून स्वत:ला चार हात दूर ठेवत विंदा करंदीकरांच्या ‘देणाºयाने देत जावे घेणाºयाने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाºयाचे हात घ्यावे..’ या काव्यपंक्ती सार्थ ठरवत कुटुंब प्रमुखांच्या अकस्मात निधनाने पोरक्या झालेल्या कुटुंबाला मदतीचा हात दोणारी संस्था येथे अस्तित्वात आहे.
दातृत्वाचा यथार्थ धडा देणारी सरस्वती मिशन बहुउद्देशीय ही संस्था समाजासमोर एक आदर्श निर्माण करीत आहे. संस्थेच्या कुठलेही पदाधिकाऱ्यांचे नाव किंवा फोटो न देता समाजातील गरजवंतांसाठी मदतीचा हात देणारी ही संस्था एक आदर्श निर्माण करीत आहे. हेच धोरण या संस्थेला इतरांपासून वेगळे ठरवते.
येथील सुतारकाम करणारे प्रवीण सुरेश पवार - बडगुजर यांची किडणी निकामी झाल्यामुळे ते अंथरुणाला खिळून होते. त्यांचे अलिकडेच निधन झाले. ऐन तारुण्याच्या व उमेदीच्या काळात कुटुंबप्रमुखाचे निधन झाल्याने कुटुंबावर अस्मानी संकट कोसळले. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा व लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. कुटुंबात दोन मुले लहान असून मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. अचानक झालेल्या घटनेमुळे त्यांच्यावर मोठे संकट आले. खामगाव येथील गणेश भेरडे यांनी मिशन प्रतिनिधींशी संपर्क करून मदतीबाबत चर्चा केली. यानंतर लगेच मिशन प्रतिनिधींनी या कुटुंबाला हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला. स्वत:च्या पायावर उभे राहता यावे म्हणून त्यांना पिको - फॉल शिलाई मशिन व इलेक्ट्रिक मोटर असा पूर्ण संच त्यांच्या घरी जाऊन सुपूर्द केला.
या कुटुंबातील गृहिणीला सरस्वती मिशनने स्वयंरोजगारासाठी मदतीचा हात देऊन पुन्हा एक आदर्श निर्माण केला. एवढेच नव्हे तर या कुटुंबातील दोन मुलांच्या शिक्षणासाठी मिशन टीम आपल्या परीने प्रयत्न करणार असल्याचे सांगून त्यांना धीर दिला.
समाजोन्नतीचा ध्यास
समाज उन्नतीच्या ध्यासाने सरस्वती मिशनने एकता आणि प्रबोधन हे ब्रीद उराशी बाळगले आहे. पद, प्रतिष्ठा व नावाशिवाय प्रामाणिक राहून अव्याहतपणे समाजसेवा करीत आहे. गेल्या दशकापासून संपूर्ण महाराष्ट्रभर या संस्थेचे कार्य सुरू आहे. ही संस्था गरजवंतांना आपत्कालीन मदत तसेच शैक्षणिक क्षेत्रात गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देते.